Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Weight Loss Tips :  रात्रीच्या जेवणानंतर 'या' चुका कराल तर तुमचंही भरभर वाढेल वजन; हा घ्या मेटेंन राहण्याचा सोपा मंत्र

Weight Loss Tips :  रात्रीच्या जेवणानंतर 'या' चुका कराल तर तुमचंही भरभर वाढेल वजन; हा घ्या मेटेंन राहण्याचा सोपा मंत्र

Weight Loss Tips How to lose weight faster : रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, कारण रात्रीचे जेवण खाल्ल्यानंतर झोपावे लागते. आणि झोपताना शरीर जास्त अन्न पचवू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 11:41 AM2021-10-31T11:41:03+5:302021-10-31T11:58:41+5:30

Weight Loss Tips How to lose weight faster : रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, कारण रात्रीचे जेवण खाल्ल्यानंतर झोपावे लागते. आणि झोपताना शरीर जास्त अन्न पचवू शकत नाही.

Weight Loss Tips : Weight loss tips 5 mistakes to avoid while dinner to control weight gain and lose weight | Weight Loss Tips :  रात्रीच्या जेवणानंतर 'या' चुका कराल तर तुमचंही भरभर वाढेल वजन; हा घ्या मेटेंन राहण्याचा सोपा मंत्र

Weight Loss Tips :  रात्रीच्या जेवणानंतर 'या' चुका कराल तर तुमचंही भरभर वाढेल वजन; हा घ्या मेटेंन राहण्याचा सोपा मंत्र

वजन वाढणे (Weight gain) ही एक सामान्य समस्या आहे. जास्त वजनामुळे अनेक शारीरिक समस्या तर होतातच, पण त्याचबरोबर अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे वजन जास्त असेल तर तुमचे वय कितीही असले तरी ते कमी करण्याचा प्रयत्न आतापासूनच करायला हवा. घरच्या कामांच्या नादात घरोघरच्या बायकांचं आपल्या जेवणाच्या वेळांकडे दुर्लक्ष होतं. आता दिवाळीसाठी प्रत्येक घरात तयारी सुरू  असणार साहाजिकच उशीरा जेवणं, पोटभर न जेवण, खाण्याकडे व्यवस्थित लक्ष न देणं हे प्रकार अनेक घरात दिसून येतात. (How to lose weight faster)    

साधारणपणे, वजन वाढण्यामध्ये दिवसभराच्या अन्नापेक्षा जास्त रात्रीचे जेवण खाण्याचा परिणाम होतो. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील अनेक यंत्रणा बंद होतात किंवा मंद होतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणाच्या वेळी काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.

१) रात्री उशीरा जेवणं

बहुतेक लोक रात्रीचे जेवण उशिरा खाण्याची चूक करतात. खरं तर, दिवसभराचे काम संपवताना अनेक वेळा लोकांना उशीर होतो किंवा काही वेळा लोकांना उशिरा जेवण घेण्याची सवय असते. अशा स्थितीत लोक अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपतात. ही सर्वात मोठी चूक आहे, ज्यामुळे तुमचे वजन वाढते. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २-३ तास ​​आधी करावे, जेणेकरून तुमच्या पचनसंस्थेला अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळेल. म्हणूनच तुम्ही तुमचे अन्न रात्री 7-8 वाजेपर्यंत खाल्ले पाहिजे आणि 10-11 वाजेपर्यंत झोपले पाहिजे, जेणेकरून तुम्ही सकाळीही योग्य वेळी उठू शकाल.

 किचनच्या नळांचा गंज २ मिनिटात निघेल; साफसफाई करताना वापरा गंज काढण्याच्या सोप्या टिप्स

२) गरजेपेक्षा जास्त जेवणं

रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, कारण रात्रीचे जेवण खाल्ल्यानंतर झोपावे लागते. आणि झोपताना शरीर जास्त अन्न पचवू शकत नाही. अशा स्थितीत तुम्ही अन्न खातात, पण ते अन्न पचत नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी रात्री पोटभर जेवण करण्याऐवजी थोडे कमी अन्न खावे आणि झोपण्याच्या ३० मिनिटे आधी एक ग्लास दूध प्यावे.

३) चुकीच्या पदार्थांचे सेवन

रात्रीचे जेवण फक्त हलकेच नाही तर ते आरोग्यदायीही असले पाहिजे. रात्रीच्या जेवणात जंक फूड आणि खूप तेलकट-मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. कारण या सर्व गोष्टींमुळे वजन वाढते. त्याऐवजी, हेल्दी होममेड फूड खा, जे तयार करताना कमी तेल वापरलं जातं. रात्रीच्या जेवणात पुरी, पराठा, पिझ्झा, भात, बिर्याणी, मैदा असे पदार्थ खाऊ नयेत.

स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

४) जेवल्यानंतर थेट झोपू नये

दिवसा आणि रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही नेहमी थोडं चालायला हवं. दुपारचं जेवण करून जर तुम्ही चालत नसाल  आणि कामाला लागत असाल तर फारशी अडचण नाही, पण रात्रीचे जेवण झाल्यावर थोडा वेळ नक्कीच फिरायला हवे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच फेरफटका मारल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजन वाढत नाही. म्हणूनच दररोज अन्न खाल्ल्यानंतर किमान 20-30 मिनिटे चालावे.

५)  चांगली झोप घेणं

वजन कमी करताना जेवणाची वेळ आणि खाद्यपदार्थांची निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची आहे रात्रीची 7 ते 9 तासांची झोप. जर तुम्हाला रात्री कमी झोप येत असेल किंवा उशिरा उठून सकाळी उशिरापर्यंत झोप येत असेल तर याचा परिणाम तुमच्या वजनावरही होतो. त्यामुळे तुम्ही योग्य वेळी अन्न खावे आणि नंतर योग्य वेळी झोपावे, जेणेकरून तुमची ७-९ तासांची झोप चांगली पूर्ण होऊ शकेल.

Web Title: Weight Loss Tips : Weight loss tips 5 mistakes to avoid while dinner to control weight gain and lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.