वजन वाढणं किंवा पोटावरची चरबी वाढणं हे खूपच कॉमन झालं आहे. यामुळे वयस्कर लोकांपासून तरूणांपर्यंत सर्वांनाच वजन वाढीचा सामना करावा लागत आहे. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी कोणी भात खाणं सोडतं, तर कोणी व्यायामासाठी जीमला जातो. हेल्दी सवयी फॉलो केल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. तज्ज्ञांच्यामते जर आपण योग्यवेळी ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर घेतला तर वाढलेलं वजन, पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत होऊ शकते. (Weight loss tips this isthe best time to have your meal breakfast lunch and dinner timing)
झोप आणि खाण्यामध्ये किती अंतर ठेवावं?
तज्ज्ञ सांगतात तुमचं शरीर जितका वेळ एक्टिव्ह राहील तितक्या चांगल्याप्रकारे कॅलरीज बर्न होतील. असं न झाल्यास कंबर आणि पोटाभोवती फॅट जमा होतं. म्हणजे जेवल्यानंतर अजिबात हालचाल न केल्यास शरीरावरील चरबी वाढू शकते. म्हणूनच जेवल्यानंतर लगेच झोपणं टाळायला हवं.
सकाळी की रात्री, कोणत्यावेळी चपाती खाल्ल्यानं लवकर वजन कमी होतं? फिट राहायचं तर...
दुपारी किंवा रात्री झोपण्याच्या ३ तास आधी जेवावं. डॉक्टर सांगतात की झोप येण्याआधीच जेवण करावं. कारण झोपण्याआधी शरीर मेलाटोनिट नावाचे हॉर्मोन रिलिज करते. त्याआधीच जेवण झालेलं असावं. जर झोपण्याच्यावेळी तुम्ही जेवलात तर लठ्ठपणा वाढू शकतो.
जेवणाची योग्यवेळ कोणती?
अनेक सर्वेक्षणांनुसार, सकाळी 7:00 वाजता नाश्ता, दुपारी 12:30 वाजता दुपारचे जेवण आणि रात्री 7:00 च्या सुमारास जेवणाची सर्वोत्तम वेळ आहे. पण रोजच्या कामाच्या गडबडीत वेळच्यावेळी जेवणं शक्य होत नाही अशावेळी १५ ते २० मिनिटं वेळ मागे पुढे होऊ शकते. पण रोजचं खाण्यापिण्याच्या अनिमियता असेल तर पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते.
वजन कमी करण्यासाठी प्रत्येक नियम पाळणे आवश्यक आहे, बरेच लोक डाएट करतात पण ते यशस्वी होत नाहीत. काही आठवडे कोणत्याही प्रकारच्या कठोर डाएटचे पालन करण्यात खरोखर काही अर्थ नाही. तुम्ही डाएट बंद केलं की परत वजन वाढत जातं. त्यापेक्षा तुम्ही सातत्य ठेवता येईल असा आहार घ्या. वॉकींग, सायकलिंग, स्विमिंग, कार्डीओ अशा फिजिकल एक्टिव्हीटीज नियमित करा.