Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं

प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं

Weight Loss Transformation : पोलिस स्टेशनमध्ये चोविस तास काम करावे लागते तरी मी घरचं जेवण जेवते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 02:10 PM2024-07-28T14:10:04+5:302024-07-29T16:55:51+5:30

Weight Loss Transformation : पोलिस स्टेशनमध्ये चोविस तास काम करावे लागते तरी मी घरचं जेवण जेवते.

Weight Loss Transformation : Sub Inspector Lost 15 Kilos In Three Months Fat To Fit journey | प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं

प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं

मूल झाल्यानंतर वजन वाढणं, त्यातून येणारं नैराश्य-लोंकांचे टोमणं, त्यात स्वत:बद्दल वाटणारी लाज यातून बऱ्याच महिला जातात. काही महिला अशाही असतात ज्या या प्रवासातून जात असताना स्वत:ला मेंटेन करण्याची जिद्द ठेवतात.(Fat To Fir Journey) दिल्ली पोलिस दलातील सब इंस्पेक्टर महिलेला सी-सेक्शनद्वारे आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर मोठ्या आव्हानांचा सामाना करावा लागतो.  पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज) ने लढत असल्यामुळे गर्भावस्थेदरम्यान वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांचे वजन  ९० किलो वाढले होते. डिलिव्हरीनंतर ६ महिन्यांनंतर त्यांचे वजन ८४ किलो होतं. ( Sub Inspector Lost 15 Kilos In Three Months Fat To Fit journey)

एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार ३ महिन्यात कमीत कमी १५ किलो वजन कमी केलं.  ३१ वर्षीय द्यामा यांनी एक पोलिस अधिकारी असल्यामुळे स्वत:ला मेंटेन करण्यात खूप मेहनत घेतली. पीसीओडी असल्यामुळे त्यांचा संघर्ष अधिकच वाढला. (Delhi Police sub Inspector Who Has PCOD Shed 15 Kg in Less Than 3 Months After Delivery) ५ ते ६ महिन्यांपासून त्या स्थितीतून जात होत्या. वजन कमी करण्यासाठी त्यांनी गोळ्या, सप्लिमेंट्स, फास्टींग असे वेगवेगळे उपाय करून पाहिले तरीही फरक दिसून आला नाही. वजन अधिकच वाढत गेले. एक वेळ अशी आली की त्यांनी आरश्यात स्वत:ला पाहणंच बंद केलं होतं.

शरीर कमजोर झालंय-थकवा येतो? B-12 कमतरता भरून काढतील ५ पदार्थ, रोज खा-फिट राहाल

फिट राहण्यासाठी द्यामा यांनी १ मे ला आपला वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला, चांगलं डाएट घेतलं, पॅकेज्ड फूडपासून लांब राहिल्या, साखरेचं सेवन कमी प्रमाणात केलं. त्या रोज कमीत कमी १० हजार पाऊलं चालायच्या. त्यांनी सांगितले की, ''मला आता साखर खाण्याची इच्छाच होत नाही. सहा महिने झाले मी चहा प्यायलेले नाही. या प्रयत्नांमुळे मी मासिक पाळीतही चांगला बदल पाहिला. चेहऱ्यावर येणारे केस कमी झाले आणि उर्जेचा स्तर वाढला. वजन कमी करण्यासाठी मला संपूर्ण कुटूंबाने प्रेरणा दिली. सासरच्या लोकांनी त्यांना असे पदार्थ खायलाच दिले नाही ज्यामुळे वजन वाढेल. माझे सासरे  माजी वॉलीबॉल प्रशिक्षक असून त्यांनी मला फिट राहण्याची प्रेरणा दिली.'' 

आहार कसा होता?

आहारात प्रोटीनचा समावेश करण्यासाठी त्यांनी पनीरचा समावेश केला. त्यांच्या रोजच्या नाश्त्यामध्ये दूधाबरोबर बदाम, अक्रोड, नाश्त्याला फळं, चपाती, भात,  दही, भाज्या आणि सॅलेड्सचा समावेश होता. डाएटमुळे त्यांच्या चेहऱ्यावरची चमक परत आली आणि वजनही कमी झाले. त्यांकडून प्रेरणा घेऊन आता त्यांची मुलं आणि पतीलाही वजन कमी करण्याची इच्छा होते. त्या सांगतात पोलिस स्टेशनमध्ये चोविस तास काम करावे लागते तरी मी घरचं जेवण जेवते. मला बाहेर खावं लागलं तर मी सॅलेड,  फळं चाट खाते, जंक फूड खात नाही. 

Web Title: Weight Loss Transformation : Sub Inspector Lost 15 Kilos In Three Months Fat To Fit journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.