Join us  

Weight loss : भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खा, पण म्हणजे कोणते? नाश्त्यासाठी ५ पदार्थ...दिवसाची प्रोटीनफुल सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2022 2:43 PM

Weight loss diet : वेटलॉससाठी उपयुक्त ठरेल आणि प्रोटीन्स (protein rich diet) पण भरपूर मिळतील, असं काही तुम्हाला नाश्त्यासाठी हवं असेल, तर हे काही पदार्थ नक्की ट्राय करा...

ठळक मुद्देहे पदार्थ असे आहेत, जे तुम्हाला भरपूर प्रोटीन तर देतातच, पण वेटलॉससाठीही अतिशय उपयुक्त ठरतात..

रात्रीचं जेवण झाल्यानंतर तब्बल ८ ते १० तासांनी आपण सकाळचा नाश्ता करतो. भरपूर मोठ्या गॅपनंतर आपण काहीतरी खातो. या मधल्या काळात आपली भरपूर एनर्जी खर्च झालेली असते आणि शरीराला पुन्हा नव्या ताकदीची गरज असते. त्यामुळे आपण नाश्त्याला जे काही खाऊ ते पौष्टिक आणि विशेष म्हणजे प्रोटीन रिच असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळेच नाश्त्याला हे काही पदार्थ नक्की खा.. हे पदार्थ असे आहेत, जे तुम्हाला भरपूर प्रोटीन तर देतातच, पण वेटलॉससाठीही  (diet for weight loss) अतिशय उपयुक्त ठरतात..

 

१. धीरडं...हरबऱ्याच्या डाळीचं धीरडं हा आपला जुना पारंपरिक पदार्थ. हरबरा हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे. धीरडं बनविताना तुम्ही त्यात कांदा, कोथिंबीर, सिमला मिरची, पत्ताकोबी अशा भाज्या टाकू शकता. आवडत असल्यास भाज्यांसोबत पनीरही टाकून खाल्ले तर अधिक उत्तम. 

 

२. स्प्राऊट चाटस्प्राऊट चाट हा नाश्त्यासाठीचा आणखी एक उत्तम पदार्थ. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, अमिनो ३ फॅटी ॲसिड, लोह हे घटक असतात. मोड आलेली कडधान्य उकडून किंवा कच्ची घेतली तरी चालतील. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर, बीट, काकडी, मुळा असं तुम्हाला पाहिजे त्या भाज्या घाला. वरून चाटमसाला आणि थोडं लिंबू पिळून हलवलं की झालं प्रोटीन रिच हेल्दी स्प्राऊट चाट तयार. 

 

३. पनीर पराठापनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी तर प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वेटलॉस करत असाल, तर तुमच्यासाठी हा एक परफेक्ट पदार्थ आहे. पनीरमधून आपल्याला व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे हा एक उत्तम नाश्ता ठरू शकतो. 

 

४. दलियादलिया या पदार्थात डाएटरी फायबर अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे हा पदार्थ पचनासाठी अतिशय उत्तम आहे. शिवाय त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्सही मिळतात. दलिया बनविताना तुम्ही त्यात भरपूर भाज्या टाकल्या तर त्याचे पोषणमुल्य आणखी वाढते. 

 

५. ओट्सओट्समधून आपल्याला बीटा ग्लुटेन आणि सोल्युबर फायबर भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टरॉलची पातळी कमी होण्यासाठी मदत होते. म्हणूनच वेटलाॅस करणाऱ्यांसाेबतच हृदयविकार असणाऱ्यांसाठीही ओट्स खाणे फायद्याचे आहे.  

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना