Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजनकाट्यावर मोजमाप करुन तोलूनमापून कॅलरी खाल्ल्या, तर वजन कमी होईल का ?

वजनकाट्यावर मोजमाप करुन तोलूनमापून कॅलरी खाल्ल्या, तर वजन कमी होईल का ?

डाएट करुनही जर वजन वाढतंय याचा अर्थ तुम्ही  जितक्या कॅलरी खाताय त्यापेक्षा कमी कॅलरी वापरताय आणि म्हणून वजन हळूहळू वाढतं आहे. पण कळणार कसं की आपण किती कॅलरी नक्की खाल्ल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 03:27 PM2021-05-10T15:27:55+5:302021-05-10T15:37:19+5:30

डाएट करुनही जर वजन वाढतंय याचा अर्थ तुम्ही  जितक्या कॅलरी खाताय त्यापेक्षा कमी कॅलरी वापरताय आणि म्हणून वजन हळूहळू वाढतं आहे. पण कळणार कसं की आपण किती कॅलरी नक्की खाल्ल्या?

Weight loss will be followed by fatigue and constant tiredness. | वजनकाट्यावर मोजमाप करुन तोलूनमापून कॅलरी खाल्ल्या, तर वजन कमी होईल का ?

वजनकाट्यावर मोजमाप करुन तोलूनमापून कॅलरी खाल्ल्या, तर वजन कमी होईल का ?

Highlightsजमलं तर आठवडा दोन आठवडे कॅलरी ट्रॅक करून आपण नक्की किती खातो आहोत याचा अंदाज घेऊ

स्वप्नाली बनसोडे

फॅट लॉस. त्यासाठीच्या सवयी यासंदर्भात  आपण गेले काही दिवस बोलतोय पण आता तुम्ही हा विचार करत असाल की प्रोटीन किती खायचं वगैरे ठीक आहे पण हे मोजणार कसं? आपण सगळेच आज काल वेगवेगळे ॲप्स वापरतो फोन मध्ये तर कॅलरी मोजण्यासाठी कित्येक ॲप्स आहेत. myfitnesspal, Fittr हे काही अँप्स तुम्ही ट्राय करून पाहू शकता. आता कॅलरी आपण कशा मोजतोय हे पण महत्वाचं आहे. सर्वसाधारणपणे एक रोटी, एक वाटी डाळ असे मोजमाप असते. आता यात प्रॉब्लेम हा आहे की मी जी रोटी बनवतेय आणि दुसरी एखादी व्यक्ती बनवतेय ती रोटी-चपाती-पोळी लहान मोठी असू शकते म्हणजेच त्याच्या कॅलरीज वेगवेगळ्या असू शकतात. बरेच जण असे असतील की ज्यांना वाटत असेल आम्ही फक्त १५०० कॅलरीज खातोय पण वजन कमी होत नाही.कारण हे असू शकतं की कॅलरी योग्य प्रकारे मोजल्या जात नाही आहेत. 

उदारणार्थ जर मी ४० ग्रॅम्स भात शिजवण्याधी मोजला तर त्या कॅलरी अधिक योग्य असणार आहेत. जेव्हा मी एक बाऊल अशा कॅलरी मोजतेय तेंव्हा त्यात कॅलरीज चुकायची जास्त शक्यता आहे. एक बाउल छोटा, मोठा, किंवा मध्यम आकाराचा पण असु शकतो आणि प्रत्येक साईझ मध्ये बसणारा भात हा कमी जास्त प्रमाणात असणार आहे. तर तुम्हाला कॅलरी ट्रॅक करून पाहायच्या असतील तर त्या अन्न शिजवण्याच्या आधी प्रमाण मोजून त्याच्या कॅलरी मोजून पाहा. आता जर असा प्रश्न असेल की ५० ग्रॅम्स भात मोजणार कसा तर उत्तर सोपं आहे, वजनकाट्यावर.

काय म्हणताय अस मोजून मोजून खायचं, कसं वाटतं ते. मी समजू शकते अश्या प्रकारच्या मोजमापाची आपल्याला सवय नाहीये पण आपण कोणतं मोजमाप वापरत नव्हतो असा तर नाहीये. किलो मध्ये सामान आणतो. ग्रॅम्स, डझन मध्ये आपण गोष्टी विकत घेतो तर मोजमाप नक्कीच नवीन नाहीये. इतकंच नाही तर एक कप तांदूळ आणि दोन कप पाणी अशीही प्रमाण आपण वापरत आलो आहोत. तर वजन काट्याचा वापर फक्त हे वेगळ्या प्रकारचं मोजमाप आहे इतकचं.

तर नक्की करून पहा सध्या तुम्ही किती कॅलरी घेताय दिवभरात.

आणि जे सगळं खाताय ते मोजायला विसरू नका मग त्यात संध्याकाळचा चहा, बिस्किट्स, सामोसा सगळं आलं. जर तुम्ही एक आठवडा मोजून पाहताय तर तुम्हाला खरंच अंदाज येईल की तुम्ही किती खाताय. जर गेल्या काही महिन्यात तुमच वजन वाढत जातंय तर हे नक्की आहे की तुम्ही नक्कीच जितक्या कॅलरी खाताय त्यापेक्षा कमी कॅलरी वापरताय आणि म्हणून वजन हळूहळू वाढतं आहे.

आपण जेवढी ऊर्जा वापरतो आहे त्यापेक्षा जास्त ऊर्जा अन्नातून येते आहे म्हणून सर्वसाधारणपणे वजन वाढत हे आपल्याला आता माहित आहे. 

आता आपण हे जाऊन घेऊ, की आणखी कोणत्या गोष्टीमुळे वजन वजनकाट्यावर वाढतं किंवा वजन कमी होण्यासाठी वेळ लागतो.

१. हार्मोनल असंतुलन

सध्या स्त्रियांमध्ये आपण कित्येक जणांकडून काहीतरी हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे असं सर्रास ऐकतो. थायरॉईड, pcod/pcos हे निश्चित ऐकायला मिळते. कित्येकदा वजन वाढण्यासाठी हॉर्मोनल किंवा  डायबिटिस सारखे बाकी काही आजार नक्कीच कारणीभूत असतात. आता हे ऐकून हताश होता कामा नये, कारण काही प्रमाणात या गोष्टीने फरक जरी पडत असेल तरी तुम्ही जर दिवसभरच्या कॅलरी कमी केल्या तर नक्कीच वजन कमी करू शकता.

२. झोपेचा अभाव आणि ताण

बरेचदा काही लोक खूप प्रयत्न करतात पण झोपेकडे दुर्लक्ष असतं. जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करताय पण जर झोप होत नसेल तर तुम्हाला हवे तसे रिझल्ट्स मिळणार नाहीत. झोप न झाल्याने आणि जर तुम्ही अत्यंत ताणतणावात आहेत तर कॉर्टिसॉल नावाचं हार्मोनचे प्रमाण वाढते, त्यामुळे वजनकाट्यावर वजन खाली जाताना दिसत नाही.  झोपेच्या अभावाने तुम्ही दैनंदिन कामही नीट पार पाडू शकणार नाहीत. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे डाएट करताय आणि व्यायाम करत आहात तर तुमचं शरीर स्ट्रेस मध्ये आहे, आणि त्याशिवाय जर बाकी खूप ताण तणाव असेल तर वजन कमी करणे आणखी अवघड होऊ शकत. स्ट्रेस मुळे हॉर्मोनल बदल तर होणारच आहेत, पण जेंव्हा तुम्हाला मानिसकरित्या चांगलं वाटत नसेल तर तुम्ही कोणत्याच डाएट आणि व्यायामाच्या रुटीन वर फार काळ टिकून राहू शकणार नाही. तेंव्हा शांत झोप आणि ताण तणावाचं नियोजन खूप महत्वाचं आहे.

तर मग मी असं समजतेय तुम्ही १-२-३ मेथड नीट फॉलो करताय.त्या सोबत आता आपण ६-७ तास झोप आणि ताण तणाव नियोजनाकडे लक्ष देऊया. आणि जमलं तर आठवडा दोन आठवडे कॅलरी ट्रॅक करून आपण नक्की किती खातो आहोत याचा अंदाज घेऊया. पुढच्या लेखात आपण किती कॅलरी कमी खाऊन वजन कमी करू शकतो या विषयी बोलूया..

 

(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)

Instagram- the_curly_fit

https://www.facebook.com/fittrwithswapnali

 

Web Title: Weight loss will be followed by fatigue and constant tiredness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.