वजन कमी करण्यासाठी डाएटिंग केलं जातं. डाएटिंग (dieting for weight loss) म्हणजे एकतर बेचव पदार्थ खाल्ले जातात किंवा खाणंच कमी केलं जातं. अर्थात हे सर्व मनाविरुध्द . अशा प्रकारच्या डाएटिंगमुळे (wrong dieting effects) शरीराला पोषण कमी मिळतं. त्यामुळे थकवा येणं, गळून जाणं असे त्रास होतात. डाएटिंगचा चुकीचा अर्थ घेऊन चुकीच्या नियमांचं पालन केल्यास असाच त्रास होतो. खरंतर डाएटिंग म्हणजे वजन कमी करण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पोषणयुक्त आहाराचं योग्य नियोजन करणं. आरोग्यास अपायकारक घटक खाण्यातून कमी करणं, वर्ज्य करणं डाएटिंगसाठी महत्वाचं असतं. आपल्या आवडीचे पौष्टिक आणि चविष्ट (tasty and healthy food for weight loss) पदार्थ खायचे नाहीत हा काही डाएटिंगचा नियम नाही. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा शोध अवश्य घ्यायला हवा. छोले सॅलेड (chickpea salad for weight loss) हा वजन कमी करण्यासाठीचा उपयुक्त , पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे. या सॅलेडचं वैशिष्ट्य ( how to make chickpea salad) म्हणजे यात आपण आपलं आवडीचं फळही घालू शकतो.
Image: Google
छोले सॅलेड कसं तयार कराल?
छोले सॅलेड तयार करण्यासाठी 1 कप रात्रभर भिजवलेले आणि नंतर शिजवून घेतलेले छोले, 1 सफरचंद, 1 गाजर, 1 टमाटा, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध , थोडा पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
छोले सॅलेड तयार करताना एका मोठ्या भांड्यात शिजवलेले छोले घ्यावेत. गाजर, टमाटा आणि सफरचंद बारीक चिरावेत. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिन्याची पानं, लिंबाचा रस, मीठ आणि जिरे पूड घालून ते वाटून चटणी तयार करुन घ्यावी. शिजवलेल्या छोल्यांमध्ये बारीक चिरलेले गाजर, टमाटा आणि सफरचंदाचे तुकडे घालावेत. हे सर्व एकत्र करुन त्यात कोथिंबीर पुदिन्याची चटणी घालावी. हे सर्व नीट एकत्र करुन त्यात वरुन मध घालावं. मध घातल्यानंतर सॅलेड पुन्हा एकदा नीट एकत्र करुन घ्यावं.
Image: Google
छोले सॅलेड खाण्याचे फायदे
1. छोले सॅलेडमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरतं.
2. छोले सॅलेडमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतंं. हे सॅलेड पचनास उत्तम असतं.
3. कोलेस्टेराॅल नियंत्रणात ठेवण्यासाठी छोले सॅलेड फायदेशीर असतं.
4. छोले सॅलेडमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्सच प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे त्वचेच्या रोग्यासाठीही हे सॅलेड उपयुक्त ठरतं.
Image: Google
5. छोल्यांमधील कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात. तर यातील प्रथिनांमुळे केस चांगले होतात.
6. छोले सॅलेड नियमित खाल्ल्यास बध्दकोष्ठता, ॲसिडिटी, अपचन या समस्या दूर होतात.
7. हदयाशी संबंधित समस्यांचा धोका छोले सॅलेड खाल्ल्यानं कमी होतो.
सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी छोले सॅलेड करता येतं. छोले सॅलेडमध्ये सफरचंदाऐवजी काकडी घातली तरी चालते. आहारात हे सॅलेड नियमित असल्यास वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.