Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...

Tips For Having Small Meals For Weight Loss : जर आपण वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून अनेकवेळा स्मॉल मिल घेत असाल तर काही लहान टिप्स फॉलो केल्या तर वेटलॉस करण्यात अधिक मदत होऊ शकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 09:56 AM2023-08-18T09:56:46+5:302023-08-18T10:17:20+5:30

Tips For Having Small Meals For Weight Loss : जर आपण वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून अनेकवेळा स्मॉल मिल घेत असाल तर काही लहान टिप्स फॉलो केल्या तर वेटलॉस करण्यात अधिक मदत होऊ शकते...

What are 5 little things while eating small meals throughout the day for weight loss. | वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...

प्रत्येक व्यक्तीला आपले वजन योग्य मापात असले पाहिजे असे वाटत असते. जर आपले वजन नियंत्रणात असेल तर आपण निरोगी व सुदृढ आयुष्य जगू शकतो. आजच्या काळातील जीवनशैलीत स्वत:ला फिट (Health Tips) ठेवण्यासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. फिटनेसचा (Fitness) संबंध थेट आपल्या दिवसभराच्या रुटीनशी असतो. दिवस सुरु झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे काही काम करतो किंवा खातो, पितो (Weight Loss diet) त्याच्या थेट परिणाम आपल्या फिटनेसवर होतो. 


 
वजन कमी करताना, आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे फार महत्वाचे असते. जेव्हा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा फक्त अन्नातील पदार्थांवरच लक्ष केंद्रित करू नये, तर आपण आपला आहार कसा घेत आहात यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. सामान्यतः असे म्हटले जाते की वजन कमी करण्यासाठी स्मॉल मिल (Small Meals) घेतले पाहिजे. अशाप्रकारे, आपली चयापचय क्रिया केवळ चांगलीच नाही तर वजन कमी करण्यास देखील मदत करते. याउलट दिवसभरातून स्मॉल मिल घेत असताना, आपल्याला काही छोट्या - छोट्या टिप्सकडे लक्ष देणे आवश्यक असते. दिवसभरातून ५ ते ६ वेळा थोडे थोडे खात असताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, ते पाहूयात(What are 5 little things while eating small meals throughout the day for weight loss).

डाएट करताना स्मॉल मिल (Small Meals) घेत असताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे... 

१. घरच्या जेवणाला द्या प्राधान्य :- दिवसभरातून स्मॉल मिल (Small Meals) घेत असताना कधी आपण घरचे शिजवलेले अन्न खातो तर कधी बाहेरचे जेवण खातो. परंतु स्मॉल मिल घेण्याची ही पद्धत योग्य नाही. नेहमी घरीच शिजवलेले अन्न खाण्याला प्राधान्य द्यावे. दिवसभरातील मेन मिल असो किंवा छोटेखानी मिल असो, त्याचे आधीपासूनच नियोजन करून ते सकाळीच तयार करणे फार महत्त्वाचे असते. असे केल्याने आपण आपल्या कॅलरीजचे प्रमाण संतुलित करू शकता आणि अशा प्रकारे आपण आपले वजन कमी करू शकता.

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

२. प्रथिने व फायबरयुक्त आहार घ्यावा :- आपण आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या मिलकडे अगदी बारकाईने लक्ष देऊ शकतोच असे नाही. परंतु वजन कमी करताना प्रत्येक छोट्या मिलवर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे असते. आपल्या प्रत्येक छोट्या मिलमध्ये प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ:- स्मॉल मिल घेताना टोफू, भाज्या, फळे, संपूर्ण धान्य किंवा शेंगा खाण्याला प्राधान्य द्यावे. 

३. हायड्रेटेड रहा :- स्मॉल मिल घेताना आपण सर्वजण आपल्या अन्नाकडे लक्ष देतो, परंतु प्रत्यक्षात आपल्या पाणी पिण्याच्या प्रमाणाकडे देखील तितकेच समान लक्ष दिले पाहिजे. शरीर हायड्रेट ठेवल्याने वजन कमी करणे सोपे होते. काहीवेळा आपण स्मॉल मिल करताना अनावश्यक स्नॅकिंग करतो, यामुळे वजन वाढते परंतु हे टाळण्यासाठी दिवसभरातून पुरेसे पाणी पिणे देखील गरजेचे असते. 

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

४. प्रोसेस्ड फूड खाणे टाळा :- वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून ठरविक वेळा स्मॉल मिल्स घेणे खूप चांगले मानले जाते. पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीही खाऊ शकतो. स्मॉल मिल घेताना आपण प्रोसेस्ड केलेले अन्न आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावेत. स्मॉल मिल घेताना प्रोसेस्ड फूड ऐवजी कोशिंबीर, ताक आणि नारळपाणी, चण्याचे चाट, मोड आलेली कडधान्य खाण्यावर अधिक भर द्यावा. 

ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का ? ब्लॅक कॉफी कधी आणि कशी प्यावी, पाहा खास टिप्स...

५. जेवण हळुहळु सावकाश खा :- आपल्या दिवसभरातील स्मॉल मिल खाण्याला आपण पुरेसा वेळ देत नाही असे अनेकदा दिसून येते. परंतु पटापट अन्न  खाल्ल्याने आपण अनेकदा विचार न करता अति प्रमाणात खातो. अशा परिस्थितीत स्मॉल मिलमधून वजन कमी होण्याऐवजी ते वाढू लागते. त्यामुळे स्मॉल मिल करण्यालाही पुरेसा वेळ दिला पाहिजे. स्मॉल मिल घेत असतांना अन्नपदार्थ हळूहळू खा आणि ते व्यवस्थित चावून खा.

सतत कच्ची फळं खाऊन ‘फिट’ राहण्याच्या नादात मॉडेलचा मृत्यू, जीवघेण्या डाएटची बळी...

Web Title: What are 5 little things while eating small meals throughout the day for weight loss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.