भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी लहान वयातच आपल्या देशाचं नाव उज्वल केलं आहे. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या ॲथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक करून त्यानं सुवर्णपदक जिंकलं. त्यांच्या या यशाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांचे अनेक वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. आणि त्याला नक्की काय खायला आवडतं, त्याचं डाएट काय आहे यातही अनेकांना रस आहे. ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटवर नीरज चोप्राचे फिजिओथेरपिस्ट इशान मारवाह यांनी त्याच्या डाएटबद्दल अधिक माहिती दिली आहे(What Does ‘Golden Boy’ Neeraj Chopra’s Diet Look Like? Details Inside).
नीरज आपल्या डाएटमध्ये काय फॉलो करतो?
ब्रेकफास्ट
नीरज आपल्या दिवसाची सुरुवात नारळ पाणी किंवा ज्यूसने करतो. तो नाश्त्यामध्ये अगदी सिंपल पण पौष्टीक पदार्थ खातो. जेणेकरून त्यांना ट्रेनिंग सेशनमध्ये खूप मदत होते. तो नाश्त्यामध्ये दोन ब्रेड, एक वाटी दलिया आणि फळे खातो.
१ महिनाभर रात्री जेवणच केलं नाही तर? खरंच वजन कमी होते, तब्येत सुधारते की अजून बिघडते
दुपारचे जेवण
नीरज दुपारच्या जेवणात दही भात, एक वाटी डाळ आणि कच्च्या भाज्यांची कोशिंबीर खातो. ज्यामुळे त्यांच्या शरीराला अनेक पौष्टीक घटक तर मिळतातच, सोबत उर्जाही मिळते.
ट्रेनिंग पिरीयड
ट्रेनिंग पिरीयड दरम्यान, नीरज बदाम आणि फ्रेश ज्यूस पितो. ट्रेनिंग आणि जिमच्या मधल्या वेळेत तो या गोष्टी खातो.
डिनर
नीरज रात्रीच्या जेवणात फळे आणि भाज्या खातो, याशिवाय उकडलेल्या भाज्यांचे सूपही पितो. तो डिनरमध्ये हलका आहार घेतो.
वजन वाढेल, पोट सुटेल म्हणून दही भात खाणं सोडू नका, एक वाटी दही भात खाण्याचे ४ जबरदस्त फायदे पाहा
पाणीपुरी आहे आवडती
नीरज कधी - कधी पाणीपुरी खातो. त्याला पाणीपुरी खूप आवडते. जेव्हा त्याला संधी मिळते, तेव्हा तो पाणी पुरी खायचं सोडत नाही.
नीरज चोप्रा आपल्या आहारात अधिक फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करतो. यामुळे शरीरात गुड फॅट्सचे प्रमाण वाढून, अतिरिक्त चरबी कमी होते. याशिवाय तो प्रोटीन सप्लिमेंट्स देखील घेतो.