Join us  

परफेक्ट बॉडी टोन आणि चमकदार त्वचेसाठी कतरीना कैफ काय खाते? वाचा, तीच सांगतेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 4:50 PM

चमकदार नितळ त्वचा आणि आकर्षक फिगर या दोन्ही गोष्टी कतरीनाचे प्लस पॉईंट्स. या दोन गोष्टींसाठी ती काय करते हे तिने नुकतंच शेअर केलं आहे. 

ठळक मुद्देती नेमकं काय करते, काय खाते, काय खात नाही, कोणता व्यायाम किती वेळ आणि कसा करते, हे सगळं कतरीनाने नुकतंच शेअर केलं आहे.

अवघ्या काही दिवसात कतरीना नवरी होणार आहे, हे आपल्याला माहितीच आहे. तिच्या लग्नाचे वेगवेगळे विधी देखील सुरू झाले आहेत. तिने आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच विकीने कुठे घर घेतलं आहे, ते कुणाचे शेजारी होणार आहेत, या गोष्टी देखील आता निश्चित झाल्या आहेत. आता लग्न एवढ्या जवळ आलं म्हटल्यावर कोणतीही नवरी स्वत:च्या त्वचेबाबत, सौंदर्याबाबत जशी कॉन्शस होणार, तशीच कॉन्शस कतरीनाही झाली आहे. मुळातच कतरीनाची त्वचा एवढी छान आहे, त्यात ती आणखी विशेष काळजी घेते. त्यामुळे लग्नात तर कतरीना चांदसी सुंदर दिखेगी यात काही वादच नाही. 

 

पण आज कतरीना जेवढी छान दिसते, तिची नितळ त्वचा, तिची फिगर आणि बॉडी टोन या सगळ्या गोष्टी काही तिला एका रात्रीतून मिळालेल्या नाहीत. हे सगळं मिळविण्यासाठी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे टिकवून ठेवण्यासाठी कतरिना खूप मनापासून मेहनत घेते. दोन दिवस एखादा प्रयोग केला आणि सोडून दिला, असं जवळपास प्रत्येकीचं होतं. पण इथेच तर खरं आपलं चुकतं ना. कतरिना तिच्या सौंदर्यासाठी आणि तिच्या फिटनेससाठी मागील अनेक वर्षांपासून अविरतपणे प्रयत्न करत आहे. ती नेमकं काय करते, काय खाते, काय खात नाही, कोणता व्यायाम किती वेळ आणि कसा करते, हे सगळं कतरीनाने नुकतंच शेअर केलं आहे. बघुया तरी कतरीनाचा हा फिटनेस फंडा नेमका आहे तरी कसा.... सहज शक्य झालं आणि जमलं तर तिच्या सारखं रूटीन फॉलो करून बघायला काही हरकत नाही...

 

असा आहे कतरीनाचा फिटनेस फंडा...- रेग्युलर वर्कआऊट आज कतरीना ३८ वर्षांची आहे. या वयातही तिनं स्वत:ला ज्या पद्धतीनं मेंटेन केलं आहे, ते खरोखरंच लाजवाब आहे. वय वाढतं तसं तिचं सौंदर्यही दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. याच सगळ्यात मुख्य कारण आहे तिचं रेग्यूलर वर्कआऊट. डेली वर्कआऊट झालंच पाहिजे. त्याबाबतीत नो एक्सक्यूज असं कतरीनाचं ठरलेलं आहे. जीममध्ये जाऊन घाम गाळल्याशिवाय कतरीनाचा दिवस काही पुर्ण होत नाही. 

 

- या पदार्थांपासून राहते दूर चीज, पनीर, बटर, तूप, साय असे कोणतेही पदार्थ खाणं कतरीना टाळते. ती दूध देखील जास्त प्रमाणात घेत नाही. दुधाऐवजी सोया मिल्क, बदाम मिल्क, सोया पनीर, स्किम्ड मिल्क असे पदार्थ खाण्यास ती प्राधान्य देते. तिच्या वेटलॉसच्या थेअरीनुसार वरील पदार्थ खाल्ले तर खूप लवकर वजन वाढते. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहणेच तिला आवडते. यासोबतच ती मैद्यापासून बनलेले पदार्थ आणि पास्ता खाणेही टाळते. तिचं असं मत आहे की या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात ग्लूटेन असतं. शरीराचा आकार किंवा बॉडीटोन सांभाळायचा असेल, तर ग्लूटेन असणारे पदार्थ खाणे चांगले नाही. 

 

- साखर खाणं टाळतेआरोग्यासाठी साखर कमी प्रमाणात खाल्ली पाहिजे, हे तर आपण जाणतोच. असंच काहीसं कतरीनाचं मत आहे. ती म्हणते की सारखेमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. त्याचा आरोग्यावर खूपच विपरित परिणाम होतो. त्यामुळे साखर असणारा कोणताही पदार्थ कतरीना खात नाही. साखरेऐवजी ती गुळ किंवा मधाचा वापर करते.  

 

- उकडलेल्या भाज्यादिवसातून एक वेळा तरी कतरीना उकडलेल्या भाज्या खाण्यास प्राधान्य देते. एकवेळ जेवण अणि एक वेळ only boiled vegetables असं काहीसं कतरीनाचं फिटनेसचं गणित आहे. या भाज्यांमध्ये ती मीठ टाकणं टाळते. कोणती भाजी किती वेळ उकडायची, तसेच आठवड्यात कोणत्या दिवशी कोणती भाजी खायची, याचं तिचं गणितही ठरलेलं आहे. कारण भाज्या अतिजास्त उकडल्या जर त्यातलं पोषणमुल्य नष्ट होतं. कतरीनासारखं हे असं आपल्याला फॉलो करता आलं, तर आपल्यालाही मिळू शकते तिच्यासारखी नितळ त्वचा.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सकतरिना कैफअन्नआहार योजना