Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थुलथुलीत पोटामुळे एक पॅन्ट धड होत नाही? रोज खा ५ गोष्टी, पोट होईल कमी

थुलथुलीत पोटामुळे एक पॅन्ट धड होत नाही? रोज खा ५ गोष्टी, पोट होईल कमी

What Foods Help Burn Belly Fat? Best Diet Plan for Weight loss : पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही, पोट सुटणार नाही, पाहा काय खायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 12:10 PM2024-06-20T12:10:31+5:302024-06-20T12:11:44+5:30

What Foods Help Burn Belly Fat? Best Diet Plan for Weight loss : पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही, पोट सुटणार नाही, पाहा काय खायचे

What Foods Help Burn Belly Fat? Best Diet Plan for Weight loss | थुलथुलीत पोटामुळे एक पॅन्ट धड होत नाही? रोज खा ५ गोष्टी, पोट होईल कमी

थुलथुलीत पोटामुळे एक पॅन्ट धड होत नाही? रोज खा ५ गोष्टी, पोट होईल कमी

लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे (Weight Loss). अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, डेस्क जॉबमुळे एकाच जागी बसणे यामुळे आपल्या शरीराची हालचाल कमी होते (Belly Fat). अशावेळी लठ्ठपणा वाढत जातो. शिवाय यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, निद्रानाश, स्ट्रेस आणि थकवा वाढत जातो. मुख्य म्हणजे पोट सुटत जाते (Weight Loss Diet).

बेली फॅट कमी करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. पण व्यायामाने बेली फॅट कमी होत नाही. जर आपल्याला बेली फॅट कमी करायचं आपण खाऊनही बेली फॅट कमी करू शकता. आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा यांनी पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय शेअर केले आहेत. यामुळे पोटाची चरबी कमी होईल(What Foods Help Burn Belly Fat? Best Diet Plan for Weight loss).

फ्लेक्ससीड्स

फ्लेक्ससीड्सचा समावेश आपण आहारात करू शकता. त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. या बिया खाल्ल्याने चयापचय वाढवण्यास मदत मिळते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते. त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यास मदत होते.

पावसाळ्यात दही खावं? कधी खावं सकाळी की रात्री? सर्दी-खोकला होण्याची भीती वाटते?

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे चयापचय वाढवण्यास आणि चरबी जाळण्यास मदत करतात. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे फॅट लॉस होण्यास मदत करतात. नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे वजन आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

बदाम

बदाम हे प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबीचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. बदामामध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे भूक नियंत्रित ठेवण्यास आणि दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते.

ओट्स

ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ओट्समध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतात. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. याच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

ती सोडून गेली आणि ‘त्यानं’ स्वत:ला बदलून टाकलं, पाहा ब्रेकअपने आयुष्य पालटवणाऱ्या तरुणाची गोष्ट

दही

दही हा प्रथिने आणि प्रोबायोटिक्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते. ग्रीक दह्याचे सेवन केल्याने शरीराला जास्त प्रमाणात प्रोटीन्स मिळते. जे स्नायू तयार करण्यास आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते. ग्रीक दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि पचनास मदत करतात.

Web Title: What Foods Help Burn Belly Fat? Best Diet Plan for Weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.