साखरेमुळे वजन वाढणं, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. जर साखरेचं अधिक प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला तब्येतीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Fitness Tips) अनेकजण वजन कमी करण्यासाठी साखर पूर्णपणे सोडण्याचा विचार करतात पण काहीही केल्या त्यांची साखर सुटत नाही. साखरेचं सेवन कमी केल्यानंतर शरीरात काही बदल दिसून येतात. कोणते बदल दिसतात ते पाहूया. (What Happens If You Stop Eating Sugar For A Week)
साखर खाणं बंद केलं तर शुगर क्रेव्हिंग्स एकदम कमी होतात. सुरूवातीला गोड खावं, गोड खावं असं खूपदा वाटतं. पण जेव्हा तुम्ही गोड खाणं पूर्णपणे बंद करता तेव्हा इंसुलिन स्पाईक्स अजिबात होत नाहीत. शुगर कंट्रोल व्यवस्थित होते. गट्स बॅक्टेरियाजसाठी साखर अजिबात चांगली नसते. त्यामुळे बॅड बॅक्टेरियाजचं प्रमाण वाढतं. अनेक रिसर्च आर्टिकल्स यावर प्रकाशित झाले आहेत. तुम्ही जितकी प्रोसेस्ड साखर खाता तितकं तुमच्या शरीराचं नुकसान होतं. जर तुम्हाला गोड खायचंच असेल तर नैसर्गिक स्वरूपातील साखर खा. तुम्ही खांडसरी किंवा खजूर खाऊ शकता.
साखर खाणं बंद केल्यानं शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. अभ्यासातून असं दिसून येतं की साखरेचं अतिरिक्त सेवन केल्यानं टाईप २ डायबिटीसचचा धोका वाढतो. याचं वैज्ञानिकांनी मुख्य कारण सांगितलं आहे. जेव्हा लोक अतिरिक्त साखरेचं सेवन करतात तेव्हा त्यांचे वजन वाढते. जास्त वजनामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही आणि इंसुलिनप्रती कमी संवेदनशीलता राहते जी टाईप २ डायबिटीसचं कारण ठरते.
झोप लवकर लागत नाही, डोक्यात सतत विचार? डॉ. श्रीराम नेने सांगतात ५ उपाय-झोपा शांत
गोड खादयपदार्थांचे सेवन केल्यानं क्रेव्हींग्स वाढतात. साखरेमुळे डोपाईनचा स्त्राव ट्रिगर होतो ज्यामुळे मास्तिष्क केंद्र उत्तेजित होते. जेव्हा तुम्ही साखरेचं सेवन बंद करता तेव्हा डोकेदुखी, ताण-तणाव आणि जास्त साखर खाण्याची इच्छा होते. हे दुष्परिणाम कमी करण्यासााठी अचानक सेवन एकदम बंद न करता हळू-हळू करा.
नवरात्र: ९ दिवस उपवास करताय तर लक्षात ठेवा ५ नियम, पित्त होऊन तब्येत बिघडणार नाही
साखर एक हाय कॅलरी फूड आहे. १ ग्राम साखरेत जवळपास ४ कॅलरीज असतात. अशा स्थितीत साखरेचं सेवन केल्यानं तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात. जर तुम्ही साखरेचं सेवन बंद केलं तर यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. म्हणून वजन कमी करण्यासाठी साखर सोडण्याचा सल्ला दिला जातो. आहारतज्ज्ञ सांगतात की आठवड्याभरासाठी साखर सोडल्यानं त्वचेत बरेच बदल झालेले दिसून येतील. त्वचा स्वच्छ आणि साफ दिसते.
साखर शरीरातील इंफ्लेमेशन वाढवते. ज्यामुळे शरीरावरील सूज, सुरकुत्या, फाईन लाईन्स सारख्या समस्या उद्भवत नाही. साखरेचं सेवन टाळल्यास त्वचा तरूण, चमकदार दिसते आणि चेहरा पातळ दिसू लागतो. साखरेचं अधिक सेवन केल्यानं पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. ज्यामुळे पोटदुखी, गॅस, ब्लोटींग यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. एका आठवड्यासाठी साखरेचे सेवन टाळल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवणार नाहीत.