खराब जीवनशैली, अति ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे (Lifestyle) लठ्ठपणाचे (Weight Gain) शिकार आपण होतो. वजन वाढलं की, गंभीर आजारांचाही धोका वाढतो (Healthy Tips). वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) आपण बर्याच गोष्टी करतो. जिम, झुंबा, वर्कआऊट, वॉक, योग यासह इतर गोष्टी करतो. मुख्य म्हणजे डाएटकडे बारकाईने लक्ष देतो. पण तितकेच डाएटकडेही लक्ष द्यायला हवे. पण अशावेळी वेट लॉस दरम्यान काय खावे? काय टाळावे? या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे.
वजन कमी करण्यासाठी शक्यतो साखर खाणं टाळण्याचा सल्ला मिळतो. साखर खाल्ल्याने जिभेला गोडवा मिळतो. पण शरीर कडू आजारांनी घेरले जातात. मुख्य म्हणजे याने वजन वाढू शकतं. जर आपलं वजन वाढतच असेल आणि आपल्याला व्यायामाशिवाय कमी करायचं असेल तर, महिनाभर साखर टाळून पाहा(What Happens to Your Body When You Cut Out Sugar for Weight Loss).
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
आरोग्यासाठी हानिकारक
साखर खाण्याऐवजी आपण नैसर्गिक साखर असणारे पदार्थ जसे की, खजूर किंवा फळे खाऊ शकता. साखर बंद केल्याने इन्शुलीन स्पाईक्स अजिबात होत नाहीत. शुगर कंट्रोल व्यवस्थित होते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. जर आपण सतत साखरेचे पदार्थ खात असाल तर, टाईप २ डायबिटीसचचा धोका वाढू शकतो.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
वजन वाढीला कारणीभूत
साखर एक हाय कॅलरी फूड आहे. १ ग्राम साखरेत जवळपास ४ कॅलरीज असतात. अशावेळी वजन वाढीला कारणीभूत साखर ठरू शकते. जास्त वजनामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही आणि इन्शुलीनप्रती कमी संवेदनशीलता राहते. जी टाईप २ डायबिटीसचं कारण ठरते. त्यामुळे साखर एकदम बंद करण्यापेक्षा हळूहळू आहारातून साखर वगळा.
हृदयाच्या आरोग्यासाठी घातक
साखरेचे अतिसेवन हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर साखर शक्यतो टाळा. वजन वाढलं हृदयाच्या संबंधितही समस्या वाढतात. त्यामुळे आहारात साखरेचा समावेश करण्याऐवजी गुळाचा वापर करा.