Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बघा सध्या सुपरहीट असणारा '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला- सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झटपट कमी करा...

बघा सध्या सुपरहीट असणारा '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला- सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झटपट कमी करा...

What Is 2-2-2 Weight Loss Formula?: वजन कमी करण्यासाठी सध्या '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला जबरदस्त ट्रेण्ड मध्ये आहे. बघा वजन कमी करण्याची ही पद्धत नेमकी आहे कशी... (how to follow 2-2-2 diet plan)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2024 11:34 AM2024-07-01T11:34:34+5:302024-07-01T11:35:34+5:30

What Is 2-2-2 Weight Loss Formula?: वजन कमी करण्यासाठी सध्या '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला जबरदस्त ट्रेण्ड मध्ये आहे. बघा वजन कमी करण्याची ही पद्धत नेमकी आहे कशी... (how to follow 2-2-2 diet plan)

what is 2-2-2 weight loss formula, how to follow 2-2-2 diet plan, best weight loss plan for healthy lifestyle | बघा सध्या सुपरहीट असणारा '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला- सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झटपट कमी करा...

बघा सध्या सुपरहीट असणारा '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला- सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झटपट कमी करा...

Highlightsफक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर खाण्यापिण्याची आणि व्यायामाची सवय लागावी म्हणूनही तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

वाढलेलं वजन कमी करणे ही चिंता सध्या अनेकांची आहे. त्यामुळे बरेच जण डाएटिंग, व्यायाम असे जमेल तसे पर्याय निवडून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, तब्येतीनुसार, वयानुसार आणि कामाच्या पद्धतीनुसार कोणाचे कोणत्या पद्धतीने किती वजन कमी होऊ शकते, याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे आहारतज्ज्ञ वेगवेगळे डाएट प्लॅन सुचवत असतात. म्हणूनच कोणाच्या तब्येतीला दिवसातून दोन वेळाच जेवून वजन कमी करणं मानवतं. तर कोणाला दर २ तासांनी थोडं थोडं खाणं सहन होतं. आता असाच एक '2-2-2' डाएट प्लॅन सध्या ट्रेण्डमध्ये आहे (what is 2-2-2 weight loss formula). हा प्लॅन नेमका कसा असतो आणि त्याने वजन कमी करण्यासाठी कशी मदत होते ते पाहूया.. (how to follow 2-2-2 diet plan)

 

खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लागणे आणि व्यायामाची सवय लागणे या दोन गोष्टींसाठी सुरुवातीच्या स्तरावर '2-2-2' डाएट प्लॅन उत्तम असल्याचे आहारतज्ज्ञ व्ही. वीणा यांनी सांगितले आहे.

वजन कमी करण्यासाठी एकवेळचं जेवण, नाश्ता बंद केला? वाचा तज्ज्ञांचा सल्ला- असं कराल तर...

इंडियन एक्सप्रेसने इंडियाने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार व्ही. वीणा सांगतात की हा वजन कमी करण्याचा एक साधा सोपा प्लॅन असून यामध्ये दर दिवशी २ फळं आणि २ भाज्या खाणे, २ लीटर पाणी पिणे आणि दिवसातून २ वेळा वॉकिंग करणे या गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो.

ताप आल्याने तोंड कडू पडलं- काही खाण्याची इच्छाच नाही? तोंडाला चव येण्यासाठी ३ पदार्थ खा

यामुळे फळं आणि भाज्यांच्या माध्यमातून पोटात ॲण्टीऑक्सिडंट्स आणि फायबर जातात. तसेच दोन लीटर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि २ वेळा चालल्याने शारिरीक हालचाली होऊन कॅलरी बर्न होण्यास मदत होते. 

 

पण हा २-२-२ चा नियम पाळताना तुम्ही इतर कोणतंही जंकफूड घेणार नाही, जो काही इतर आहार घ्याल तो संतुलित, पौष्टिक असेल याची काळजी घेणं गरजेचं आहे.

टॉयलेट- बाथरुमच्या खिडक्यांच्या काचा स्वच्छ करणं अवघड जातं? बघा सोपी ट्रिक- ५ मिनिटांत काचा चकाचक

असं केलं तरच '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युल्याचा योग्य परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल. फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर खाण्यापिण्याची आणि व्यायामाची सवय लागावी म्हणूनही तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

 

Web Title: what is 2-2-2 weight loss formula, how to follow 2-2-2 diet plan, best weight loss plan for healthy lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.