Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > क्रिती सेनन सांगते तसं कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात....

क्रिती सेनन सांगते तसं कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात....

Weight Loss Tips With Bullet Coffee: वजन कमी करण्यासाठी किंवा पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी तुम्हीही बुलेट कॉफी किंवा कॉफीमध्ये तूप टाकून पित असाल तर आहारतज्ज्ञांचा हा सल्ला एकदा वाचा.. ( coffee with ghee or coconut oil is really useful for weight loss?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 12:46 PM2024-03-26T12:46:18+5:302024-03-26T12:47:09+5:30

Weight Loss Tips With Bullet Coffee: वजन कमी करण्यासाठी किंवा पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी तुम्हीही बुलेट कॉफी किंवा कॉफीमध्ये तूप टाकून पित असाल तर आहारतज्ज्ञांचा हा सल्ला एकदा वाचा.. ( coffee with ghee or coconut oil is really useful for weight loss?)

What is bullet coffee, coffee with ghee or coconut oil is really useful for weight loss? actress Kriti Senon's weight loss tips with bullet coffee | क्रिती सेनन सांगते तसं कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात....

क्रिती सेनन सांगते तसं कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात....

Highlightsरिकाम्यापोटी काही फॅट आपल्या पोटात गेले तर त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. याचा परिणाम म्हणजे आपोआपच आपण नाश्त्यामध्ये कमी कॅलरी घेतो.

वजन कमी करण्यासाठी हल्ली अनेक जण मनानेच कोणतेही उपाय करतात. कधी कधी एखादा वेटलॉस ट्रेण्ड येतो आणि कित्येक जण कोणताही विचार न करता, कोणाचाही सल्ला न घेता तो ट्रेण्ड फॉलो करतात. बुलेट काॅफीचा प्रकारही तसाच आहे (What is bullet coffee?). बुलेट कॉफी म्हणजे सकाळी रिकाम्यापोटी दूध न टाकता कोरी कॉफी किंवा ब्लॅक कॉफी करायची आणि त्या कॉफीमध्ये एक चमचा तूप किंवा खोबरेल तेल टाकून प्यायचं . क्रिती सेननसह अनेक सेलिब्रिटी अशा पद्धतीची कॉफी पितात (Kriti Senon's weight loss tips with bullet coffee). सेलिब्रिटींचं पाहून अनेक जण तसंच करतात. पण असं केल्याने वेटलॉस होतो का किंवा त्याचे आरोग्यावर इतर काय परिणाम होतात, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा पाहा. ( coffee with ghee or coconut oil is really useful for weight loss?)

 

वेटलॉससाठी बुलेट कॉफी खरंच उपयुक्त आहे का?

वेटलॉससाठी बुलेट कॉफी प्यायल्याने काही फायदा होतो का, याविषयीची माहिती amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. या काॅफीविषयी काही वर्षांपुर्वी एक रिसर्च करण्यात आला होता.

होळीनंतर फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ३ टिप्स- डाग होतील स्वच्छ आणि घर पुन्हा चकाचक

त्यानुसार जर रिकाम्यापोटी काही फॅट आपल्या पोटात गेले तर त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. याचा परिणाम म्हणजे आपोआपच आपण नाश्त्यामध्ये कमी कॅलरी घेतो. तसेच पोटात फॅट गेल्यामुळे पुढे दिर्घकाळ काहीही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. पण एवढं करणंच वेटलॉससाठी किंवा पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त नाही.

 

कारण यासोबतच तुमचा नेहमीचा आहार कसा आहे, व्यायाम किंवा इतर शारिरीक हालचाली कशा आहेत, या गोष्टीही खूप जास्त महत्त्वाच्या आहेत.

मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना 'हे' पदार्थ खाऊ घाला- सुपर कम्प्युटरसारखं पळेल डोकं... 

क्रिती सेननसह इतर सेलिब्रिटी ही कॉफी तर घेतातच, पण त्यासोबतच त्याच्या डाएटचं आणि व्यायामाचंही खूप काटेकोर पालन करतात. त्यामुळे अशा पद्धतीची कॉफी घेताना एकदा आहारतज्ज्ञांकडून सल्ला घ्या, असंही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. 

 

Web Title: What is bullet coffee, coffee with ghee or coconut oil is really useful for weight loss? actress Kriti Senon's weight loss tips with bullet coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.