Join us  

विराट कोहली-दिशा पटानीसारखे फिटनेसवेडे खातात ‘हा’ १ पदार्थ, पाहा त्यांचा सोपा पॉवरफूल पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 6:43 PM

What Is Mono Diet? How To Follow, What To Eat, Benefits : मोनोट्रॉफिक डाएट? नाव ऐकून वेगळं वाटलं ना? या डाएटमुळे वेट लॉस होतो?

वेट लॉस करणं आजकाल जणू टास्क वाटू लागलं आहे (Weight loss). वजन कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो (Fitness). पण बऱ्याच प्रकारचे फंडे फॉलो करूनही वेट लॉस होईलच असे नाही. सध्या सेलिब्रिटी फॉलो करत असलेला मोनोट्रॉफिक डाएट खूप चर्चेत आहे. यामुळे वेट लॉस जलद होत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. हा डाएट विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि दिशा पटानी यांसारखे सेलिब्रिटी फॉलो करतात. ही पद्धत वेट लॉस करण्यास मदत करते.

पण मोनोट्रॉफिक डाएट म्हणजे नेमकं काय? याने आरोग्याला कोणता फायदा होतो? यामुळे वजन कमी होते का? हा डाएट नेमका फॉलो कसा करावा?(What Is Mono Diet? How To Follow, What To Eat, Benefits).

मोनोट्रॉफिक डाएट म्हणजे नेमकं काय?

मोनोट्रॉफिक डाएटचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे प्रत्येक जेवणात समान पदार्थ समाविष्ट करणे. जसे की, बटाटे, सफरचंद, भाज्या, फळे, असे 'मोनो मिल' खाऊन डाएट फॉलो करू शकता. आपण हा आहार कितीही काळ फॉलो करू शकता. बहुतांश लोक हा डाएट एक आठवडा फॉलो करतात. तर काही महिनाभर. यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.

मोनोट्रॉफिक डाएटचे फायदे

- मोनो डाएट हा वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये असणारा आहार साधा, सरळ आणि सकस आहार आहे.

फक्त रुपच नाही नजरही होईल तेज, चमचाभर तूप ‘या’ पद्धतीने खा-बॅड कोलेस्टेरॉलही घटेल

- हा डाएट फॉलो केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.

- यामुळे माइंडफुल ईटिंगला मदत होते.

- हा डाएट इतर डाएटच्या तुलनेत सोपा आहे.

- यामुळे आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे सोपे होते, आणि अधिक खाण्याच्या आवेगापासून बचाव होतो.

- याव्यतिरिक्त, हे डाएट शरीराला आवश्यक असलेले कर्बोदक, प्रथिने आणि चरबी यांचा समतोल राखण्यासाठी मदत करते.

- मोनो डाएटमध्ये अनेक वेळा नारळ तेलाचाही वापर होतो. नारळ तेलात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि चांगल्या फॅट्स मुळे शरीरातील वाईट फॅट्स कमी होण्यास मदत होते.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

- नारळ तेलामुळे पचनशक्तीही सुधारते. उर्जाची पातळी वाढवण्यासाठी आपण आहारात नारळ तेलाचा वापर करू शकता.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सविराट कोहलीदिशा पाटनी