Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढेल म्हणून चपाती खाणं टाळताय? 'या' पिठाच्या चपात्या खा; अभिनेत्रींप्रमाणे दिसाल सुडौल..

वजन वाढेल म्हणून चपाती खाणं टाळताय? 'या' पिठाच्या चपात्या खा; अभिनेत्रींप्रमाणे दिसाल सुडौल..

What is Rajgira and how it helps in weight loss : थुलथुलीत पोट- हाडांनाही मिळेल बळकटी; फक्त 'या' पिठाच्या चपात्या रोज खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2024 04:13 PM2024-05-19T16:13:26+5:302024-05-19T17:33:34+5:30

What is Rajgira and how it helps in weight loss : थुलथुलीत पोट- हाडांनाही मिळेल बळकटी; फक्त 'या' पिठाच्या चपात्या रोज खा..

What is Rajgira and how it helps in weight loss | वजन वाढेल म्हणून चपाती खाणं टाळताय? 'या' पिठाच्या चपात्या खा; अभिनेत्रींप्रमाणे दिसाल सुडौल..

वजन वाढेल म्हणून चपाती खाणं टाळताय? 'या' पिठाच्या चपात्या खा; अभिनेत्रींप्रमाणे दिसाल सुडौल..

आजकाल वजन कमी करण्याचं सर्वात ट्रेण्डींग पद्धत म्हणजे डायटींग (Dieting). प्रत्येक जण वजन कमी किंवा शरीर मेन्टेन ठेवण्यासाठी डायटींग करीत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही लोक आहारातून चपाती वगळतात तर, काही जण भात आणि फ्राईड पदार्थ खाणं टाळतात (Weight Loss). प्रत्येकाला वाटते आपली फिगर एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे दिसावी.

जर आपल्याला पोट आणि एकंदरीत वजन कमी करायचं असेल तर, आहारात राजगिरा पिठाच्या चपात्यांचा समावेश करा. वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञ देखील राजगिरा पिठापासून बनवलेली चपाती खाण्याचा सल्ला देतात. पण राजगिराची चपाती कधी खावी? राजगिरा पिठाची चपाती खाल्ल्याने आरोग्याला कितपत फायदा मिळतो? पाहूयात(What is Rajgira and how it helps in weight loss).

राजगिरा म्हणजे काय?

शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा पदार्थ म्हणजे राजगिरा. राजगिऱ्यामध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. राजगिरा हा कॅल्शिअम आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त त्यात मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम यांसारखी आवश्यक तत्वही असतात. राजगिरा हा अँटिऑक्सिडंटचा खजिना आहे. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. शिवाय त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. जे खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही.

ना डाळ - ना सोडा, कपभर तांदुळ घ्या, करा मऊ जाळीदार नारळाचा डोसा! पौष्टिक आणि पोटभर

वेट लॉससाठी राजगिरा कसे खावे?

- वजन कमी करण्यासाठी आपण राजगिरापासून तयार चपात्या खाऊ शकता.

- राजगिऱ्याच्या पीठामध्ये आपण भाज्या किंवा पनीर देखील मिक्स करू शकता. यामुळे अधिक पौष्टीक मूल्य त्यातील वाढतील.

- राजगिऱ्याच्या पीठामध्ये ग्लूटेन खूप कमी असते. हे सहज आपल्याला कोणत्याही बाजारात उपलब्ध होऊ शकतात.

- हवं असल्यास आपण त्याचे विविध पदार्थ तयार करू शकता. आपण पुलाव किंवा खिचडी तयार करून खाऊ शकता.

राजगिरा खाण्याचे इतर फायदे

- राजगिरा हाडांसाठी फायदेशीर ठरते. त्यात इतर धान्यांच्या तुलनेत तीन पटिंनी अधिक कॅल्शिअम असतं. त्यामुळे याचा डाएटमध्ये समावेश केल्याने हाडं मजबुत होण्यास मदत होते. तसेच ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

मिठाच्या पाण्यात १ गोष्ट घालून पितळेची भांडी भिजवा, न घासताही पितळेची भांडी चमकतील

- राजगिऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात लायसिन असतं, जे केस दाट आणि मजबुत करण्यासाठी मदत करतं. तसेच राजगिऱ्या सिस्टीनही असतं, जे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं.

- राजगिऱ्याच्या बियांमध्ये फायटोस्टरोल असते. जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. तसेच हे शरीरामधील शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 

Web Title: What is Rajgira and how it helps in weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.