Join us  

ग्रीन टी कधी प्यायचा? सकाळी उठल्या उठल्या की रात्री झोपण्याआधी.. तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 4:00 PM

टीव्हीवरच्या जाहिराती बघून, आपल्या ओळखीच्यांचं अनुकरण करुन ग्रीन टी (green tea) प्यायला सुरुवात करणं चुकीचं. ग्रीन टी पिण्याची योग्य पध्दत (right way to take green tea) आणि योग्य वेळ माहिती असली तरच ग्रीन टी पिण्याचा फायदा (green tea benefits) आरोग्यास मिळतो. 

ठळक मुद्देग्रीन टी सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी घेतल्यास तो न पचण्याची शक्यताच जास्त असते.रात्री झोपण्यआधी ग्रीन टी पिल्यास अनिद्रेची समस्या उद्भवते.

हेल्दी राहायचं तर आपल्या दिवसभराच्या आहारात ग्रीन टीचा(green tea)  समावेश करायलाच हवा असा आग्रह अनेकांचा असतो. ग्रीन टीमुळे वजन कमी होतं म्हणून तर घरी, ऑफिसमध्ये दिवसातून अनेकवेळा ग्रीन टी पिणारे अनेकजण आहेत. आहारतज्ज्ञांच्या मते ग्रीन टी प्याल्याने बाॅडी डिटाॅक्स होते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. वजन कमी करण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ग्रीन टी पिणं आवश्यक असतो.  पण हे झालं ग्रीन टी पिण्याचं (importance of taking green tea)  महत्व. पण ग्रीन टी कधी प्यावा? ग्रीन टी कधी प्याल्यास योग्य ठरेल? रात्री झोपताना ग्रीन टी घेतला तर चालतो का? सकाळी उठल्यावर नेहेमीच्या चहाच्या जागी ग्रीन टी घेणं योग्य राहिल का? ग्रीन टी रिकाम्या पोटी पिणं (drink green tea) योग्य आहे का? असे प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरं दिल्ली येथील आहार तज्ज्ञ श्रेया गर्ग यांनी दिली आहेत. अनेकजण टीव्हीवरच्या जाहिराती पाहून, इतरांचं पाहून ग्रीन टी प्यायला सुरुवात करतात. पण ग्रीन टी पिण्याची योग्य पध्दत (right way of taking green tea) समजून घेतल्याशिवाय ग्रीन टी पिणं ही चुकीची आणि घातक सवय आहे. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्याला तर तो पचत नाही. अशा प्रकारे ग्रीन टी पिण्याचा त्रास होवू शकतो. 

Image: Google

ग्रीन टी कधी कसा प्यावा?

1. श्रेया गर्ग यांच्या मते ग्रीन टी सकाळी नाश्ता करण्याच्या एक तास आधी प्यायला हवा. एका अभ्यासानुसार ग्रीन टी मध्ये टॅनिन असतं. त्यामुळे खाण्याआधी 1 ते दीड तास आधी ग्रीन टी प्यायला तर बध्दकोष्ठता, पोटदुखी, पचनासंबंधीचे विकार ठीक होतात. 

2. ग्रीन टी सकाळी आणि संध्याकाळी प्याल्यास चयापचय क्रिया गतिमान होते. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर असतं. 

3. दिवसभरात 3 ते 4 कपापेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये. ग्रीन टीमध्ये कॅफीन हा घटक असतो. त्यामुळे 3 ते 4 कपापेक्षा जास्त ग्रीन प्याल्यास उलट्या, जुलाब होण्याची शक्यता असते. 

4. ग्रीन टीची चव कडवट असल्यानं अनेकजण त्यात साखर घालून पितात.  पण अशा पध्दतीनं ग्रीन टी प्याल्यास ग्रीन टीचे फायदेशरीरास मिळत नाही. 

Image: Google

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

श्रेया गर्ग यांच्या मते सकाळी व्यायाम झाल्यानंतर अर्ध्या तासानं ग्रीन टी प्यावा. सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान ग्रीन टी पिणं योग्य. दुपारी जेवणाआधी 1 तास अगोदर ग्रीन टी प्याल्यास त्याचा फायदा होतो. तर संध्याकाळी काही खाल्ल्यानंतर 1 ते 2 तासांनी ग्रीन टी प्यावा. पण रात्री झोपण्याआधी ग्रीन टी पिऊ नये यामुळे अनिद्रेची समस्या निर्माण होते. 

Image: Google

ग्रीन टी का प्यावा?

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ सांभाळून आणि योग्य पध्दतीनं ग्रीन टी प्याल्यास त्याचे अनेक फायदे होतात. 

1. ग्रीन टीमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे चयापचयाच्या क्रियेची गती वाढते. ग्रीन टी प्याल्यानं शरीरातील फॅटस कमी होतात. याचा फायदा वजन कमी होण्यासाठी होतो. 

2. एका अभ्यासानुसार ग्रीन टीमध्ये पाॅलिफिनाॅल्स असतात. हे पाॅलिफिनाॅल्स ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यास रोखतात.

3. ग्रीन टीमध्ये असलेलं कॅफीन चहा आणि काॅफीमध्ये असलेल्या कॅफीनच्या तुलनेत चांगलं असतं. मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असतो. ज्या लोकांना जास्त ताण येतो त्यांना ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

4. रोज 1 ते 2 कप ग्रीन टी प्याल्यास शरीरातील  बॅड कोलेस्टेराॅलची पातळी कमी होते. ह्दयाच्या आरोग्यासाठी ही बाब फायदेशीर मानली जाते. ग्रीन टी औषधासारखा प्रमाणात घेतल्यास त्याचा फायदा होतो. ग्रीन टीचा समावेश आपल्या रोजच्या आहारात नियमित करण्याआधी आपल्या डाॅक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

टॅग्स :आहार योजनाअन्नवेट लॉस टिप्स