चातुर्मासाला आता लवकरच प्रारंभ होणार. या चार महिन्याच्या काळात खाण्यापिण्यावर अनेक पारंपरिक बंधनं ( diet rules in chaturmas) असतात. त्यामागे काही धार्मिक कारणंही सांगितली जातात. मात्र याकाळात तब्येत आणि खानपान याचा ( science behind diet rules in chaturmas) आरोग्यही म्हणूनही विचार करायला हवा. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांच्या काळात पावसाळा असतो. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वेगवेगळे आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता इतर ऋतुंपेक्षा जास्त असते. आयुर्वेदाप्रमाणे पावसाळ्यात आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचं प्रमाण असंतुलित होवून त्याचा परिणाम आपल्या शरीरातील सांधे, चयापचय क्रिया आणि एकूणच आरोग्यावर होतो. या काळात विविध प्रकारचे आजार, संसर्ग होवून शरीरप्रकृती बिघडते. सर्दी, ताप, पडसे हे आजार बळावतात. त्यामुळे काही पत्थ्यं आपल्या तब्येतीप्रमाणे सांभाळणं योग्य.
Image: Google
चातुर्मासातील खाण्यापिण्याची पथ्यं
१. चातुर्मासाचा चार महिन्यांच्या काळात हलकं अन्नं खावं. आंबवलेले, पचायला जड पदार्थ, मसूर्, उडीद डळी, दही, दूध हे पदार्थ कमी खावेत. शक्यतो टाळावेत. खायचे झाल्यास कमी आणि नियम पाळून खावेत. ऑगस्ट ते सप्टेंबर अर्थात आषाढ ते भाद्रपद हे तीन महिने पावसाचं प्रमाण अधिक असतं. म्हणून या काळात दही, आंबवलेले पदार्थ खाऊ नये असं म्हणतात. कारण हे पदार्थ पचण्यास जड असतात. शरीरातील चयापचय क्रिया या काळात मंदावलेली असते. पचनक्रिया कमकुवत असते. त्यामुळे दही आणि आंबवलेले पदार्थ खाल्ल्यास पचनाचे विकार होतात.
२. उडीद डाळ, मसूर डाळ या डाळीत प्रथिनं भरपूर असतात. मात्र पावसाळ्याच्या काळात पचनक्रिया मंदावलेली असल्याने ज्यांना पचनाचा त्रास त्यांनी या डाळी खाणं टाळणंच योग्य.
३. चातुर्मासाच्या काळात हिरव्या पालेभाज्या खायच्या असल्यास त्या नीट बघून, स्वच्छ करुन, पाण्यानं धुवून नीट शिजवून खाव्यात. संसर्ग धोका आणि पचनाचा त्रास दोन्ही सांभाळावं. हिरव्या पालेभाज्या, कोबी, फ्लाॅवर या भाज्या खाणम् टाळाव्यात. भोपळा, कारली, ढेमसे, तोंडली, दोडकी, गिलकं या भाज्या चातुर्मासात खाणं आरोग्यदायी असतं.
Image: Google
४. दूध चांगले उकळून प्यावे. उकळल्याने दुधातले जिवाणु मरतात. दुधामध्ये थोडं पाणी घालून पातळ करुन प्यावं. लॅक्टोजचं प्रमाण कमी होवून दूध पचायला सोपं जातं.
५. जेवण वेळच्या वेळी करावे. संध्याकळचं जेवण लवकर आटोपावं. यामुळे चयापचयावर ताण न येता पचनक्रिया सुरळीत राहाते. चातुर्मासात एक वेळ जेवण्याचा नियमही अनेकजण पाळतात. यालाच इंटरमिटेंट फास्टिंग असं म्हणतात. या पथ्यामुळे आतडे स्वच्छ होतात. आतड्यांचा सूज, दाह या समस्या कमी होवून आतड्यांशी संबंधित गंभीर आजार होण्याचा धोका टळतो.