Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस

तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस

What Is The 30-30-30 Formula For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सध्या अनेक जण '३०- ३०- ३०' हा नवा फॉर्म्युला वापरून पाहात आहेत. बघा यामध्ये नेमकं काय करायचं असतं... (Important tips for weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 09:09 AM2024-01-25T09:09:56+5:302024-01-25T09:10:02+5:30

What Is The 30-30-30 Formula For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सध्या अनेक जण '३०- ३०- ३०' हा नवा फॉर्म्युला वापरून पाहात आहेत. बघा यामध्ये नेमकं काय करायचं असतं... (Important tips for weight loss)

What is the 30-30-30 formula for weight loss? Important tips for weight loss, how to do weight loss in few days? | तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस

तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस

Highlightsआता काहीजण वजन कमी करण्यासाठी '३०- ३०- ३०' हा फॉर्म्युला वापरत आहेत. बघा या नव्या ट्रेण्डनुसार वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं असतं...

हल्ली बहुतांश लोक कामानिमित्त सतत ८ ते १० तास बसून असतात. शिवाय खाण्यापिण्याच्या सवयी, पदार्थही बदलले आहेत. व्यायामाला वेळ मिळत नाही. जवळपास कुठे जायचं असेल तर आपण दुचाकी, चारचाकीचा वापर करतो.... अशा कित्येक कारणांमुळे हल्ली बहुतांश लोकांना लठ्ठपणाचा किंवा वजनवाढीचा त्रास होतो आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात (how to do weight loss in few days?). अनेक नवनवीन वेटलॉस ट्रेण्ड येत असतात. आता काहीजण वजन कमी करण्यासाठी '३०- ३०- ३०' हा फॉर्म्युला वापरत आहेत (What is the 30-30-30 formula for weight loss?). बघा या नव्या ट्रेण्डनुसार वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं असतं... (Important tips for weight loss)

 

'३०- ३०- ३०' वेटलॉस फॉर्म्युला कसा आहे?

या पद्धतीनुसार वेटलॉस करायचा असेल तर तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांच्या आत ३० ग्रॅम प्रोटीन्स घ्यावे लागतील आणि त्यानंतर ३० मिनिटे तुम्हाला व्यायाम करावा लागेल.

रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण..

हे या फिटनेस मंंत्राचं साधं- सोपं गणित आहे. या व्यतिरिक्त यामध्ये खाण्यापिण्याचा किंवा व्यायामाचा दुसरा कोणताही नियम नाही. यामुळे मेटबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया वाढते आणि वेटलॉस होण्यासाठी त्याची मदत होते, असं मानतात. शिवाय आरोग्यासाठी प्रोटिन्स आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. असे हे अगदी साधे- सोपे सूत्र आहे. 

 

याविषयी healthshots.com यांनी दिलेल्या माहितीनुसार फिटनेस ट्रेनर भावना हरचंद्राई यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाची प्रोटिन्स घेण्याची तसेच व्यायाम करण्याची क्षमता वेगवेगळी असते.

राष्ट्रीय बालिका दिनी काजोलची न्यासासाठी इमोशनल पोस्ट, म्हणाली लेकीला एवढं सक्षम बनवू की.....

प्रौढ लोकांनी त्यांच्या वजनाच्या प्रत्येक किलोनुसार १ ग्रॅम प्रोटिन घेतले पाहिजे. म्हणजेच ६० किलो वजन असणाऱ्या व्यक्तीच्या आहारात रोज ६० ग्रॅम प्रोटिन्स जायला पाहिजेत. तसेच दिवसाच्या दुसऱ्या भागात म्हणजे साधारणपणे दुपारनंतर आहारात साखरेचे प्रमाण खूप कमी करायला पाहिजे. यामुळेही वजन कमी करण्यास मदत होते, असं त्यांनी सांगितलं. 

 

Web Title: What is the 30-30-30 formula for weight loss? Important tips for weight loss, how to do weight loss in few days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.