चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, हॉर्मोनल इम्बेलंस, ताण-तणाव, खराब लाईफस्टाईल यामुळे वजन वेगाने वाढत आहे. लठ्ठपणामुळे इतर अनेक गंभीर समस्याही उद्भवत आहेत ज्यामुळे तुमचा लूकही खराब होतो. अनेकदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर तुम्ही वजन वाढण्याचं कारण शोधायला हवं. वॉक करताना काही व्यायाम प्रकार केल्यास तुमचं वजन सहज कमी होण्यास मदत होईल. (Walking Workout For Weight Loss)
योगा एक्सपर्ट नताशा करून यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. रोज चालणं होतं तरी वजन कमी होत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं. रोजच्या चालण्यात काही बदल केले तर तुम्हाला पोट कमी करणं सोपं होईल. (What Is The Best Walking Workout For Weight Loss)
१) इंटरवल वॉकिंग
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार टाईप २ डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये धोका कमी करण्यासाठी हा वॉक फायदेशीर ठरतो. ग्लायसेमिक इंडेक्स कमी होण्यासही मदत होते. तुम्ही वॉकिंगच्या या पद्धतीनं वजन सहज कमी करू शकता. यात तुम्हाला वेगवेगळ्या स्पीडमध्ये वॉक करावं लागेल. काहीवेळ वेगानं चाला त्यानंतर नॉर्मल वेगानं चाला. रेग्युलर इंटरवेलमध्ये वॉक करा. ज्यामुळे वेगानं वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढवण्यास मदत होते. आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही वेळी तुम्ही हा वॉक करू शकता. फक्त जेवणानंतर लगेच वॉक करू नका. ३० सेंकद वॉर्म अप केल्यानंतर हे वॉक करा.
२) वॉकिंग लंजेस
पाय आणि कंबर यात योग्य अंतरावर ठेवा. नंतर पाय पुढे करून गुडघ्यातून वाकवा. त्यानंतर शरीर थोडं खाली वाकवा, असं केल्यानंतर गुडघे दुमडून घ्या. नंतर मागचा पाय आणि पुढचा पाय यात अंतर ठेवून ९० अंशात ठेवा. मागच्या गुडघा फरशीपासून वर असावा. नंतर सामान्य स्थितीत या. प्रत्येकवेळी तुम्हाला योग्य पोझिशन मेंटेन करावी लागेल. ज्यामुळे सहज वजन कमी करणं सोपं होतं. खासकरून बेली फॅट कमी करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरते.