नाश्ता हा रोजच्या रुटीनचा एक भाग असला तरी तो अतिशय गांभिर्याने घ्यायला हवा. अनेक जण नाश्त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यात महिलांचे प्रमाण तर भरपूर आहे. बऱ्याच महिला मुलांना, नवऱ्याला अगदी वेळेवर नाश्ता देतात. पण स्वत:चा नाश्ता करण्यासाठी मात्र घडाळ्यात कधी ११ वाजून जातात, त्यांना कळतही नाही. किंवा बऱ्याच जणी तर नाश्ता टाळून थेट दुपारी जेवणच करतात. नाश्त्याच्या बाबतीत अशी हेळसांड करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे (what should we eat in breakfast?). त्यामुळेच नाश्ता कधी करावा (What is the correct time for having breakfast?) आणि नाश्त्यामध्ये नेमके कोणते पदार्थ खावेत, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा वाचा...(What should be the ideal food for breakfast?)
नाश्ता करण्याची योग्य वेळ काेणती?
नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती, नाश्त्यामध्ये नेमके कोणते पदार्थ असावेत आणि कोणते टाळावेत, याविषयी माहिती देणारा एक छानसा व्हिडिओ _mariab_fatimab_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
बाळाच्या बोरन्हाणासाठी करा मायेनं डेकोरेशन, ६ सोप्या आयडिया-कमी वेळात घर सजेल सुंदर
यामध्ये तज्ज्ञ सांगत आहेत की सकाळी उठल्यानंतर १ तासाच्या आत आपण नाश्ता केला पाहिजे. याचं कारण म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्या जेव्हा शारिरीक हालचाली सुरू झाल्या की लिव्हर ॲक्टिव्हेट होत असते. तासाभरात आपण नाश्ता केला की लिव्हरचे काम सुरू होते आणि ते संपूर्ण दिवस पुरेल एवढी एनर्जी, ग्लुकोज तयार करण्याच्या कामाला लागते. नाश्ता करायला उशीर केल्यास अपचन, ॲसिडिटी, चयापचय क्रिया असे त्रास होऊ लागतात.
नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ असावेत?
नाश्ता हा नेहमी पोटभरच करावा. तसेच नाश्त्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि प्रोटिन्स असणारे पदार्थ भरपूर प्रमाणात असावेत.
डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही- फक्त ३ पदार्थ वापरून तयार करा हर्बल डाय, केस काळेभोर
कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेगवेगळ्या धान्यांपासून तयार झालेले पदार्थ. नाश्त्यामध्ये पॅकफूड, मैद्याचे पदार्थ खाणं नेहमीच टाळावं. कारण आहारतज्ज्ञांच्या भाषेत सांगायचं झालं तर पॅकफूड हे लिव्हिंग फूड नसून डेड फूड आहे.