Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > योगर्ट आणि दही यात नेमका काय फरक? आरोग्यासाठी काय चांगलं, काय वाईट? - कसं ठरवाल

योगर्ट आणि दही यात नेमका काय फरक? आरोग्यासाठी काय चांगलं, काय वाईट? - कसं ठरवाल

Health tips: योगर्ट म्हणजेच दही आणि दही म्हणजेच योगर्ट (yogurt and curd)... फक्त नावे वेगवेगळी, असं बहुतांश भारतीयांना वाटतं.. पण खरंच तसं असतं का? की हे दोन्ही दोन वेगवेगळे पदार्थ आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 07:06 PM2022-02-02T19:06:32+5:302022-02-02T19:09:31+5:30

Health tips: योगर्ट म्हणजेच दही आणि दही म्हणजेच योगर्ट (yogurt and curd)... फक्त नावे वेगवेगळी, असं बहुतांश भारतीयांना वाटतं.. पण खरंच तसं असतं का? की हे दोन्ही दोन वेगवेगळे पदार्थ आहेत?

What is the difference between yogurt and curd? Which is more beneficial? | योगर्ट आणि दही यात नेमका काय फरक? आरोग्यासाठी काय चांगलं, काय वाईट? - कसं ठरवाल

योगर्ट आणि दही यात नेमका काय फरक? आरोग्यासाठी काय चांगलं, काय वाईट? - कसं ठरवाल

Highlightsदही की योगर्ट आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं?

दही आणि योगर्ट हे एकच आहेत.. याची अनेक लोकांना एवढी खात्री असते की दही खायला सांगितल्यावर ते योगर्टही खाऊ शकतात आणि दही हेच योगर्ट आहे.. असं समजून त्यांचा सर्रास वापरही करू शकतात...  त्यामुळेच सगळ्यात आधी हे जाणून घ्या की दही आणि योगर्ट हे दोन्ही काही प्रमाणात एकसारखे असले तरी आणि हे दोन्हीही डेअरी प्रोडक्ट (dairy products) असले तरी ते पुर्णपणे वेगळे आहेत... 

 

दही आणि योगर्ट बनविण्याची पद्धतही पुर्णपणे वेगळी आहे.. दही हे विरझण टाकून आपण घरच्याघरी लावू शकतो. जे नैसर्गिक ॲसिडीक घटक टाकून लावण्यात येतं.. आणि ते अगदी सहजपणे घरी लावता येतं.. पण योगर्टचं मात्र तसं नसतं.. योगर्ट हे कृत्रिम ॲसिड टाकून बनविण्यात येतं आणि त्याच्यावर बरीच प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे योगर्ट घरच्याघरी बनविणे सहजशक्य नाही. हा या दोघांमधला सगळ्यात पहिला आणि मोठा फरक आहे. 

 

दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियम म्हणजेच लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात. आपण दह्यात कसं आणि किती विरझण घालतो, तसेच दही शिळं आहे की ताजं आहे यावर त्यातील लाईव्ह बॅक्टेरियाचं प्रमाण अवलंबून असतं. तर योगर्टमध्ये Lactobacillus Bulgarisand Streptococcus thermophilus या बॅक्टेरियाचा जिवंत स्ट्रेन विशिष्ट प्रमाणात उपलब्ध असतो. दही हे घरगुती वापरासाठी तर योगर्ट हे प्रामुख्याने व्यावसायिक उद्दिष्टांसाठी वापरण्यात येतं. 

 

दही की योगर्ट आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं?
दही आणि योगर्ट या दोघांमध्येही पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणात असतात. दही हे शरीराला थंडावा देतं..  त्यामुळे मसालेदार जेवण झाल्यानंतर किंवा उन्हाळ्यात उष्णता वाढल्यानंतर शरीराला थंडावा मिळावा, यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. 
तर योगर्टमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात. high-protein food म्हणून योगर्ट ओळखलं जातं. योगर्टचे काही प्रकार आहेत, त्यामध्ये तर दह्यापेक्षा दुप्पट प्रमाणात प्रोटीन्स असतात. 

 

दही आणि योगर्ट या दोघांमध्येही खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. वाढत्या वयासोबत होणारे arthritis आणि osteoporosis हे आजार टाळण्यासाठी दही आणि योगर्ट हे दोन्ही उपयुक्त ठरतात. दह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. त्यामुळे दही खाणे हाडांसाठी आणि दातांसाठी अतिशय चांगले मानले जाते. बाजारात अनेक प्रकारचे फ्लेवर्ड योगर्ट मिळतात. पण त्यामध्ये प्रिझर्वेटीव्ह आणि साखर यांचं प्रमाण अधिक असू शकतं.. त्यामुळे फ्लेवर्ड योगर्ट खाणे टाळावे, असं सांगितलं जातं. 
 

Web Title: What is the difference between yogurt and curd? Which is more beneficial?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.