ब्रेकफास्ट हा आपल्या दिवसभराच्या आहारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट. रात्री जेवल्यापासून साधारणपणे १० तासांच्या गॅपनंतर आपण ब्रेकफास्ट करतो. हा ब्रेकफास्ट हेल्दी आणि पोटभरीचा असावा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. ब्रेकफास्टमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स असतील तर शरीराचे पोषण व्हायला मदत होते. मग ब्रेकफास्टला काय खावं, किती प्रमाणात खावं, त्यात कोणकोणते पोषक घटक असावेत अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा होतात (Perfect Breakfast Time to loose weight). मात्र ब्रेकफास्ट कोणत्या वेळेला केलेला अधिक चांगला हे आपल्याला माहित नसते. त्यातही आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असू तर कोणत्या वेळेला नाश्ता केलेला चांगला हे आपल्याला माहित असायला हवे (what is the best time to eat breakfast for weight loss).
सकाळी व्यायाम केल्यानंतर काय खायचं? ४ पदार्थ, फिट होण्याचा वाढवतील वेग
संशोधन काय सांगते ?
अनेकदा आपण वजन कमी करायचे म्हणून आहार कमी करतो. अशावेळी आपण अनेकदा घाईच्या वेळात ब्रेकफास्ट करणेही टाळतो. मात्र असे करणे चुकीचे आहे, कारण त्यामुळे वजन कमी न होता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असते. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले टिम स्पेक्टर सांगतात, ब्रेकफास्ट न करण्यापेक्षा तो उशीरा म्हणजेच ९ ऐवजी ११ वाजता करणे वजन कमी करणाऱ्यांसाठी फायद्याचे असते. असे केल्याने महिन्याला तुमचे वजन २ ते ५ किलोने कमी होऊ शकते. मात्र त्यासोबत तुमचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे.
Weight Loss Diet Tips : तुम्हीही व्हाल मस्त बारीक, वजन होईल कमी- डाएटमध्ये करा फक्त ५ छोटे बदल
काय आहे यामागील तथ्य ?
आपण रात्री साधारणपण ९ वाजता जेवतो. सकाळी उठल्यावर आवरुन आपल्याला ब्रेकफास्ट करेपर्यंत ९ वाजतात. म्हणजे आपले रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये साधारण १२ तासांचा काळ जातो. पण हा वेळ जर १४ तासांचा असेल तर आपला सलग १४ तास उपवास होतो आणि त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधकांनी काही व्यक्तींचा अभ्यास केला. या व्यक्तींची रात्रीच्या जेवणाची वेळ ८ ते ९ च्या दरम्यान होती तर ब्रेकफास्टची वेळ १०.३० ते ११ च्या दरम्यान होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वेगवेगळी फॅन्सी डाएट फॉलो करण्यापेक्षा ब्रेकफास्टची वेळ २ तासाने पुढे ढकलणे जास्त सोपे आणि परिणामकारक ठरु शकते.