सध्या वाढते वजन ही एक कॉमन समस्या झाली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण सगळेचजण काही ना काही उपाय करत असतोच. वजन कमी करण्यासाठी फास्टिंग, डाएटिंग, एक्सरसाइज यांसारखे अनेक उपाय आजमावून पाहिले जातात. बदलत्या काळानुसार वजन कमी करण्याच्या उपायांचे ट्रेंड देखील बदलत जातात.
वॉटर फास्टिंग हा उपाय सध्या वजन कमी करण्यासाठी खूप ट्रेंडमध्ये आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियावरही वॉटर फास्टिंग वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे बोलले जात आहे. वॉटर फास्टिंग म्हणजे नेमकं काय ? त्याचे फायदे कोणते ? आणि वॉटर फास्टिंग करण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहुयात.
१. वॉटर फास्टिंग म्हणजे नेमकं काय ?
वॉटर फास्टिंग हा एक प्रकारचा उपवास असून यात पाणी पिण्याऐवजी काहीही खाल्ले जात नाही. वॉटर फास्टिंग हा एक प्रकारचा कठोर उपवास आहे आणि हा उपवास अनेक दिवस, आठवडे केला जातो. वॉटर फास्टिंग हा एक प्रकारचा उपवास आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती फक्त पाणी पिते आणि त्याशिवाय कोणतेही सॉलिड किंवा लिक्विड फूड घेत नाही.
डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी...
रात्री झोपताना कोणत्या प्रकारच्या ब्रेसियर घालू नयेत? नको त्या आजारपणाचा वाढतो धोका...
२. वॉटर फास्टिंग करण्याचे फायदे कोणते ?
१. वजन कमी करणे :- वॉटर फास्टिंगमुळे वजन झपाट्याने कमी होऊ शकते कारण यामुळे ऊर्जा मिळण्यासाठी शरीरातील फॅट्स जाळले जातात.
२. आरोग्याची स्थिती सुधारते :- वॉटर फास्टिंगमुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत मिळते. यामुळे पचनासंबंधित आजार किंवा अॅसिडिटी, पोटात जळजळ होणे अशा समस्या कमी होतात.
३. शरीर स्वच्छ करणे :- शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकल्याने आपले शरीर शुद्ध होते. शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी वॉटर फास्टिंग करणे गरजेचे असते.
४. मनःशांती :- वॉटर फास्टिंग केल्याने मानसिक शांती मिळते.
३. वॉटर फास्टिंग कसे कार्य करते ?
वॉटर फास्टिंग दरम्यान, आपले शरीर अन्नाशिवाय सुरळीत सुरु असते आणि उर्जेसाठी उपलब्ध चरबी वापरण्यास सुरुवात करते. या प्रक्रियेला 'केटोसिस' म्हणतात. केटोसिस दरम्यान, शरीरात केटोन बॉडीज तयार होतात, जे पर्यायी उर्जा स्त्रोत म्हणून काम करतात.
४. वॉटर फास्टिंग करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी...
१. डॉक्टरांचा सल्ला घ्या :- वॉटर फास्टिंग करणे खूप कठीण आहे आणि ते केवळ वैद्यकीय देखरेखीखाली किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच केले पाहिजे.
२. शारीरिक तपासणी करा :- वॉटर फास्टिंग सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करुन घ्या.
३. हळूहळू सुरुवात करा :- जर तुम्हाला वॉटर फास्टिंग करायचे असेल तर हळूहळू सुरुवात करा आणि कालांतराने कालावधी वाढवा.
४. पुरेसे पाणी प्या :- वॉटर फास्टिंग करताना पुरेसे पाणी पिणे फार महत्वाचे आहे.
५. विश्रांती :- वॉटर फास्टिंग करताना पुरेशी विश्रांती घ्या.