Join us

शरीरात जमा पाण्याने वाढू शकतं तुमचं वजन, जाणून घ्या कसं कमी कराल वॉटर वेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:01 IST

Water Weight Reduce Tips: वॉटर वेट म्हणजे शरीरात पाणी जास्त प्रमाणात जमा होणं. हे वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतं जसे की, खाणं-पिणं, हार्मोन असंतुलन किंवा एखादा आजार.

Water Weight Reduce Tips: सकाळी झोपेतून उठल्यावर पोट सूजलेला किंवा पोट फुगलेलं जाणवतं का? जर असं तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही वॉटर वेट रिटेन करत असू शकता. वॉटर वेट म्हणजे शरीरात पाणी जास्त प्रमाणात जमा होणं. हे वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतं जसे की, खाणं-पिणं, हार्मोन असंतुलन किंवा एखादा आजार. अशात आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला वॉटर वेट कमी करण्यास मदत मिळेल.

काय असतं वॉटर वेट?

वॉटर वेटचा अर्थ आहे की, शरीरात पाण्याचं प्रमाण सामान्यापेक्षा जास्त झालं आहे. हे पाणी सेल्स, टिश्यूज आणि रक्तात जमा होतं. ज्यामुळे शरीर सूजलेलं दिसतं. 

वॉटर वेट वाढण्याची कारणं

- मिठाचं जास्त सेवन केल्याने ही समस्या होऊ शकते. मिठामुळे पाणी शरीरात रोखलं जातं. त्यामुळेच शरीरात सूज वाढते.

- भरपूर पाणी न पिणे हे सुद्धा याचं एक कारण असू शकतं. योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने शरीर पाण्याला रोखून ठेवतं.

- मासिक पाळी, गर्भधारणा किंवा मेनोपॉज दरम्यान हार्मोन असंतुलन झाल्याने वॉटर वेट वाढू शकतं.

- काही औषधे जसे की, स्टेरॉइड आणि काही ब्लड प्रेशरच्या औषधांमुळे वॉटर वेट वाढू शकतं.

- किडनी शरीरातून एक्स्ट्रा पाणी आणि मिठाला बाहेर काढतात. अशात किडनीची समस्या असेल तर शरीरात पाणी जमा होऊ लागतं.

- लिव्हरही शरीरातून एक्स्ट्रा पाणी काढण्यास मदत करतं. जर लिव्हरची काही समस्या असेल तर वॉटर वेट वाढू शकतं.

वॉटर वेट कमी करण्याचे उपाय

मिठाचं सेवन कमी करा

प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड्स आणि जंक फूडमध्ये मीठ भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मिठाचं सेवन कमी करून तुम्ही वॉटर वेट कमी करू शकता.

भरपूर पाणी प्यावे

हे जरा विचित्र वाटू शकतं, पण भरपूर पाणी प्यायल्याने शरीराला संकेत मिळतो की, आता पाणी रोखण्याची गरज नाही.

पोटॅशिअम असलेल्या गोष्टी

केळ, संत्री, पालक आणि टोमॅटोमध्ये भरपूर पोटॅशिअम असतं. यांद्वारे एक्स्ट्रा पाणी काढण्यास मदत मिळते.

कॅफीन आणि अल्कोहोलचं सेवन कमी

कॅफीन आणि अल्कोहोल डाययूरेटिक असतात. ज्याचा अर्थ हा की, हे शरीरातून पाणी काढतात. पण यांचं जास्त सेवन केल्यास शरीरात पाणी जमा होऊ लागतं.

नियमितपणे एक्सरसाईज

एक्सरसाईजने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि एक्स्ट्रा पाणी काढण्यासही मदत मिळते.

हेल्दी डाएट

हेल्दी डाएट घेणं फार गरजेचं असतं. फळं, भाज्या, कडधान्य, कमी फॅट आणि प्रोटीन भरपूर असलेला आहार घ्यावा. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स