Join us

जिममध्ये व्यायाम करताना कधीच करू नका 'या' छोट्या चुका; कमी होण्याऐवजी वाढेल वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:03 IST

सकाळ-संध्याकाळ धावण्याबरोबरच जिममध्ये तासनतास घाम गाळतात. पण कधी कधी खूप प्रयत्न करूनही त्यांचं वजन कमीच होत नाही.

लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांना हेल्दी डाएटसोबत हेवी वर्कआऊट करावे लागतात. यासाठी सकाळ-संध्याकाळ धावण्याबरोबरच ते जिममध्ये तासनतास घाम गाळतात. पण कधी कधी खूप प्रयत्न करूनही त्यांचं वजन कमीच होत नाही. कारण अशा स्थितीत समजून घ्या की, व्यायाम करताना तुम्ही काहीतरी चुका करत आहात. व्यायाम करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या. 

बरेच लोक जे वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात, फक्त कार्डिओ एक्सरसाईज करतात, लठ्ठपणा कमी करण्यासाठी फक्त हे पुरेसं नाही, तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगवरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तरच हवे असलेले परिणाम मिळू शकतात. काही लोकांना खूप लवकर बारीक व्हायचं असतं, अशा प्रयत्नात ते जास्त व्यायाम करायला लागतात, पण हे करणं टाळलं पाहिजे.

स्नायू आणि हाडांवर याचा अतिरिक्त दबाव पडतो. यामुळे फ्रॅक्चरचा मोठा धोका वाढतो. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी सर्वात आधी ट्रेनरचा सल्ला नक्की घ्या. काही लोक फक्त १५ ते २० मिनिटं व्यायाम करतात आणि त्यांचं वजन कमी होईल अशी आशा करतात, तर ही एक मोठी चूक आहे. तुम्ही किमान ४० ते ४५ मिनिटं व्यायाम करा, तरच तुम्हाला फरक दिसेल.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत राहायला हवं यात शंका नाही, पण तुम्ही तुमच्या आहारात किती कॅलरीज घेत आहात याची काळजी घेतली नाही तर तुमचं वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं. प्रोटीन हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. परंतु जर तुम्ही वर्कआउटनंतर जास्त प्रमाणात प्रोटीन घेतलं तर वजन कमी करणं कठीण होतं. तुम्ही डाळी, पालक आणि अंडी ठराविक प्रमाणात खाऊ शकता. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स