बॉलीवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभी असतानाही, ती अजूनही तिशीतली तरुणीच दिसते (Shilpa Shetty). तिच्या सौंदर्यामागे फिटनेस आणि डाएट या दोन गोष्टी असल्याचं ती सांगते. शिल्पाच्या टवटवीत त्वचा आणि फिटनेस मागचं रहस्य काय? असा प्रश्न अनेकांना पडतो (Fitness).
ती आपल्या डाएटला काटेकोरपणे फॉलो करते. ती आपल्याला फिटनेस रुटीनचे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियात शेअर करीत असते. वेट लॉससाठी शिल्पा नक्की खाते काय? जर आपल्यालाही शिल्पासारखी फिगर हवी असेल तर, ती फॉलो करत असलेल्या डाएटला महिनाभर फॉलो करून पाहा. ज्यामुळे शरीरात नक्कीच फरक दिसेल(What Shilpa Shetty eats to stay fit and fabulous).
शिल्पा शेट्टी कोणता आहार फॉलो करतात?
अभिनेत्री शिल्पा नेहमी संतुलित आणि आरोग्यदायी डाएट फॉलो करतात. शिल्पा तिचा आहार हे तिच्या फिटनेसचे सर्वात मोठे रहस्य मानते.
वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..
हेल्दी कार्ब आणि प्रोटीन
शिल्पा तिच्या रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करते. यासह हेल्दी कार्ब्सयुक्त पदार्थ खाते. शिल्पा ब्राऊन शुगर, ब्राऊन राइस, होल ग्रेन ब्रेड आणि प्रोसेस्ड पास्ता खाते.
'या' पिठाच्या भाकऱ्या खा
आपण सहसा दिवसाची सुरुवात किंवा लंच आणि डिनरमध्ये गव्हाची पोळी खातो. पण शिल्पा गव्हाची पोळी नसून, ज्वारीची भाकरी खाते. ज्वारीची भाकरी फायबर आणि मॅग्नेशियम समृद्ध असते. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. वेट लॉससाठी आपण ज्वारीची भाकरी खाऊ शकता.
पोर्शन कण्ट्रोल
शरीरातील चयापचय वाढवण्यासाठी आपण दिवसातून ५ - ६ वेळा वेळी अन्न खाऊ शकता. पण यात पोर्शन कण्ट्रोलमध्ये राहावे. जेणेकरून अन्न व्यवस्थित पचते. दिवसभर आपल्याला कां करण्यासाठी उर्जाही मिळते.
फक्त ब्रशने घासून दात मजबूत होत नाहीत; यासाठी ४ पैकी १ गोष्ट रोज खा; दुधासारखी बत्तीशी दिसेल शुभ्र
हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या
हायड्रेटेड राहण्यासाठी शिल्पा दिवसभरात भरपूर पाणी पिते. तिला विविध भाज्यांचा रस आणि नारळपाणीही आवडते. सतत पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होते आणि बॉडी डिटॉक्समुळे त्वचेवर चमकही येते.