वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बऱ्याच लोकांना हा अनुभव येतो की काही केल्या त्यांचं वजन लवकर कमी होत नाही. वजन थोडंसं कमी होतं आणि पुन्हा तेवढ्याच वेगात झपाट्याने वाढतं. त्यामुळे मग व्यायाम, डाएटिंग करूनही म्हणावा तसा फरक वजनात दिसून येत नाही. तुमचंही तसंच झालं असेल तर आता जेवताना काही गोष्टी कटाक्षाने करून पाहा (4 simple tips for weight control). यामुळे वाढतं पोट, मांड्या, कंबर, दंड सगळंच कंट्रोलमध्ये येईल आणि वजनाचा काटा आपोआप स्थिर होण्यास मदत होईल. (what should be the ideal diet for weightloss)
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी जेवताना ४ गोष्टी करा
१. नाश्ता कसा करावा?
सकाळी ९ वाजेच्या आत तुमचा नाश्ता व्हायला पाहिजे. नाश्त्यामध्ये प्रोटीन्स, फायबरयुक्त पदार्थ अधिक असावेत.
सतत अपचनाचा त्रास? आहारतज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने लवंग खा- पचन चांगलं होऊन मिळतील ५ फायदे
आवळ्याचा रस, लिंबू सरबत, फळं, कडधान्ये, सॅलेड, दही, दूध, शिजवलेल्या भाज्या तुमच्या नाश्त्यामध्ये अधिकाधिक घेण्याचा प्रयत्न करा.
२. दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ खावे?
सकाळी ९ वाजेच्या आधी नाश्ता केल्यानंतर दुपारचे जेवण १ ते दिड वाजेदरम्यान घ्या.
मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी
त्यामध्ये सुरुवातीला सूप, ताक, लिंबू पाणी असे पदार्थ घ्या. त्यानंतर सॅलेड खा. नंतर कडधान्यांच्या ऊसळी घ्या. असं सगळं पौष्टिक खाणं झाल्यानंतर पोळी, भात खाण्यास सुरुवात करा.
३. रात्रीचे जेवण कसे असावे?
रात्रीचे जेवण सायंकाळी ७ वाजेपर्यंत करावे आणि ते हलके असावे. दलिया, खिचडी असे पचायला हलके असणारे पदार्थ घ्या.
वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स
तसेच सूपदेखील घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर साधारण ३ तासांनी झोपणार असाल तर सुकामेवा आणि दूध असं घेऊ शकता.
४. हे देखील लक्षात घ्या..
बाहेरचे अन्नपदार्थ तसेच जंकफूड खाणं पुर्णपणे टाळा. मोबाईल, टीव्ही पाहात घाईघाईने जेवण करणे टाळा.
सारा अली खान म्हणते- मेरे लिये कोई कुछ नही करनेवाला... हे मला खूप लवकर समजलं, कारण...
जेवताना पुर्ण लक्ष खाण्याकडेच असावे. तसेच सकाळी लवकर उठण्याची, रात्री लवकर झोपण्याची आणि तुमच्या वेळेनुसार कधीही अर्धा तास तरी व्यायाम करण्याची सवय लावा, असं तज्ज्ञ सांगतात.