'वाढते वजन' ही दिवसेंदिवस प्रत्येकाची एक कॉमन समस्या बनत आहे. प्रत्येकजण आपले वाढलेले वजन कमी करण्याच्या मागे असतात. यासाठी आपण अनेक प्रकारचे डाएट, जिम, योगा यांसारख्या अनेक पर्यायांचा वापर करतो. वजन कमी करण्यासाठी आपण डाएटसोबतच आपल्या डेली रुटीनमध्ये अनेक बदल करतो. वजन कमी करण्यात व्यायामाची जितकी भूमिका असते तितकीच डाएटची (2 breakfast mistakes you might be making each morning, here’s how it affects weight loss) देखील असते. वजन कमी करण्यात आपले डाएट किंवा आपण काय खातो, कसे खातो हे अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे वजन कमी करताना डाएटकडे लक्ष देणे गरजेचे असते(What should you not eat for breakfast to lose weight?)
आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या नाश्त्याने होते. असं म्हटलं जात की सकाळचा नाश्ता हाच आपल्याला दिवसभर काम करण्याची ऊर्जा देतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा पौष्टिक व हेल्दी असावा. असे असले तरीही काहीवेळा न कळत आपण सकाळचा नाश्ता करताना अनेक लहान - मोठ्या (2 Breakfast mistakes you should avoid) चुका करतो, अशा या रोज होणाऱ्या छोट्याशा चुकांमुळे (Weight loss: Breakfast mistakes that can hamper your weight loss journey) आपले वजन कमी होत नाही. सकाळचा नाश्ता घेताना होणाऱ्या या छोट्या चुका टाळून आपण झटपट आपले वजन कमी करु शकतो. वजन कमी करण्यासाठी ( 2 breakfast mistakes that are not letting you lose weight) एलिव्हेट नाऊच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी व आरोग्य तज्ज्ञ डॉ. नीता देशपांडे सांगतात की, आपले वजन कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या लाइफस्टाईलमध्ये छोटे - मोठे बदल केले पाहिजेत. जेवण किंवा सकाळचा नाश्ता याबद्दल बोलायचे झाले तर आपल्याला वजन कमी करण्यासाठीच्या अनेक हेल्दी व पौष्टिक गोष्टी सहज विकत मिळतील. ज्याच्या मदतीने तुम्ही चवीसोबतच तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकाल(Weight Loss Tips: Best & Worst Foods To Eat For Breakfast When Trying To Lose Weight).
वजन कमी करताना नाश्त्यात कोणते पदार्थ खावेत ?
सकाळचा नाश्ता हा हेवी असावा असे अनेकदा म्हटले जाते, पण याचा अर्थ तेलकट पदार्थ खावेत असा अजिबात नाही. कारण अनेकदा आपण नाश्त्यात पराठे, आलू - पुरी, कचोरी असे अनेक हेवी पदार्थ खातो. या सर्व गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे आपले वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. या सर्व गोष्टीं ऐवजी प्रथिनयुक्त अन्नपदार्थ सकाळच्या नाश्त्यात खावेत. प्रोटीनरीच असलेल्या पदार्थांबाबत बोलायचे तर, यासाठी तुम्ही दही, पनीर, डाळी, उसळी, तेलबिया आणि काजू-बदाम, शेंगदाणे यांसारख्या पदार्थांचा नाश्त्यात समावेश करु शकता. यासोबतच आपण नाश्त्यात अनेक प्रकारच्या प्रथिनयुक्त भाज्यांचाही समावेश करू शकता.
वजन कमी करता करता केसांना गळती लागली ? ५ सोप्या टिप्स, केस गळणं बंद...
वेटलॉससाठी गव्हाच्या पिठाऐवजी खा ४ प्रकारच्या पौष्टिक पिठाच्या पोळ्या, वजनात फरक दिसेल झटपट...
वजन कमी करण्यासाठी आपण नाश्त्यासोबत कोणते ड्रिंक्स पिऊ शकता ?
आपल्यापैकी बहुतेकांना नाश्त्यात चहा किंवा कॉफी प्यायला आवडते. असे असले तरीही सकाळच्या नाश्त्यात चहा घेतल्याने आपले वजन अजिबात कमी होणार नाही, उलट ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. या सर्वांऐवजी आपण नाश्त्यात आरोग्यदायी घटकांपासून बनवलेल्या पेयांचा समावेश करु शकता. यासाठी आपण साखरेशिवाय ताक, लिंबू पाणी किंवा कोणत्याही फळांचा ताजा ज्यूस पिऊ शकता. या सर्व अन्नपदार्थांचा आपल्या नाश्त्यात समावेश केल्याने चवीसोबतच आपल्या शरीरात अधिक ऊर्जा जाणवेल.
कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...