Join us  

व्यायाम केल्यानंतर भात खाल्ला तर वजन वाढतं का? पोट कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 8:37 AM

What To Eat After A Workout Post : वर्कआऊटनंतर काय खायचं काय नाही याबाबत बरेचजण प्रश्न विचारतात पण भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जेवल्यासारखं वाटतच नाही

जिमला जाऊन लोक स्वत:ला फिट असल्याप्रमाणे दाखवतात पण जिममधून बाहेर आल्यानंतर लगेच त्यांना भूक लागते. (Health Tips)  व्यायाम करून बाहेर आल्यानंतर काय खावे काय खाऊ नये याबाबत  त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. (What To Eat After A Workout Post) वर्कआऊटनंतर काय खायचं काय नाही याबाबत बरेचजण प्रश्न विचारतात पण भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जेवल्यासारखं वाटतच नाही. भारताच्या प्रत्येक घरात भात खाल्ला जातो. (Eating Rice After Workout Is Healthy Or Not Expert Explains)

व्यायाम आणि डाएटचं रुटीन सुरू असताना लोक बऱ्याच गोष्टी कमी प्रमाणात खातात. अशावेळी भात  खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं की नाही असा प्रश्न पडतो.  फिटनेस एक्सपर्ट्सनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.  होली फॅमिली दिल्लीच्या डायटिशियन सना गिल यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

वर्कआऊटनंतर भात  खावा की खाऊ नये? (Can We Eat Rice After Workout)

वर्कआऊटनंतर तुम्ही भाताचे सेवन करू शकता. तांदळात कार्ब्सचे प्रमाण जास्त असते. तांदूळ खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते. भाताबरोबर तुम्ही ब्रोकोली, एंडी अशा पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे मसल्स रिकव्हर होण्यास मदत होते.  भात योग्य प्रमाणात खावा आणि भाताबरोबर ताज्या भाज्यांबरोबर याचे सेवन करा ज्यामुळे वजन वाढणार नाही. भात खाल्ल्याने पोट बराचवेळ भरलेलं राहतं आणि अनावश्यक खाण्याच्या क्रेव्हिंग्स  होत नाहीत. म्हणूनच तुम्ही भाताला पोस्ट वर्कआऊट मिलचा एक भाग बनवू शकता. 

वर्कआऊटनंतर काय खायला हवं? (What to Eat After Workout)

वर्कआऊटनंतर शरीराला कार्ब्स आणि प्रोटीन्सची आवश्यकता असते. व्यायाम केल्यानंतर शरीराची एनर्जी कमी होते.   कॅलरीज लॉस भरून काढण्यासाठी आणि मसल्सची रिकव्हरी भरून काढण्यासाठी पोषक तत्वांचा आहारात समावेश करा. वर्कआऊटनंतर प्रोटीन शेक किंवा प्रोटीन्सची परिपूर्ण अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. वर्कआऊटनंतर तुम्ही हेल्दी फॅट्सचे सेवनही करू शकता.  व्यायामानंतर शरीर हायड्रेट ठेवणंही फार महत्वाचे असते. व्यायामानंतर पाण्याचे सेवन करत राहा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य