वाढत्या वजनाची चिंता सध्या अनेकांना सतावते आहे. ज्यांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो, ते वजन कमी करण्यासाठी डाएटिंगचा पर्याय निवडतात. काही जण व्यवस्थित आहारतज्ज्ञांकडे जाऊन डाएट चार्ट लिहून घेतात आणि त्याप्रमाणे आहार ठेवतात. तर काही लोक मनानेच नेहमीच्या आहारापेक्षा थोडा आहार कमी घेतात. यातही बरेच जण असे असतात जे पोळ्या कमी खातात. म्हणजेच २ पोळ्या नेहमी खात असतील तर एकाच पोळीवर किंवा चपातीवर येतात (what to eat for fast weight loss?). असं करून वजन कमी झालं तरी त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी पोळ्या कमी खाण्यापेक्षा भाकरी खाण्यावर भर द्या (best food for weight loss). पण त्यासाठी नेमकी कोणती भाकरी कशा पद्धतीने खावी ते माहिती हवं.. (which chapati or roti is best for weight loss?)
वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी खावी?
वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी खाल्ल्याने निश्चितच फायदा होतो. त्यासोबतच मधुमेहासोबतच अन्य आजारही दूर राहतात. ज्वारीची भाकरी ग्लूटेन फ्री असते.
रात्रीचं जेवण लवकर केलं तर मध्यरात्री भूक लागते? ५ पदार्थ खा- वजन वाढणार नाही
तसेच ज्वारीमुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते, अशी माहिती आहारतज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी दिली. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्वारीमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
ज्वारीच्या भाकरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पोट लवकर भरल्याची भावना निर्माण होते. शिवाय पुढे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे साहजिकच भूक कमी लागते. त्यामुळे इतर पदार्थ कमी खाल्ले जातात. तोंडावर नियंत्रण राहिल्यामुळे वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते.
तुम्हाला माहिती आहे का झाडूमध्ये किती कॅलरी, फॅट्स असतात? बघा मजेशीर व्हायरल फोटो
शिवाय ज्वारीमध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम आणि फॉस्फरस या घटकांमुळे हाडं मजबूत राहतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी गव्हाची पोळी किंवा चपाती नेहमीपेक्षा कमी खाण्याचा विचार करत असाल तर तो सोडा आणि ज्वारीची भाकरी पोटभर खा. त्याचा निश्चितच वजनावर आणि तब्येतीवर अधिक चांगला परिणाम दिसून येईल.