Lunch For Weight Loss: आजकालचं धावपळीचं जीवन आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणामुळे वैगातगले आहेत. ते वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय आहेत. मात्र, योग्य दिशेनं काम करणं फार गरजेचं असतं. केवळ एक्सरसाईज नाही तर योग्य आहार घेणंही वजन कमी करण्यासाठी महत्वाचं आहे. योग्य आहार घेतला तरच तुमच्या शरीरात वाढलेली चरबी कमी होईल. अशात दुपारच्या जेवणात काय खाता हेही महत्वाचं आहे. दुपारच्या जेवणात काय खाऊन तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय खावं?
१) फायबर आणि लो कॅलरी
फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. सोबतच पचन तंत्रही मजबूत राहतं. यासाठी तुम्ही काकडी, टोमॅटो, गाजर, पत्ता कोबी यांचा आहारात समावेश करावा. वेगवेगळ्या पालेभाज्यांमध्येही फायबर भरपूर प्रमाणात असतं. इतकंच नाही तर वेगवेगळ्या डाळी जसे की, मसूर, मूग आणि तूर यातही प्रोटीन आणि फायबर भरपूर असतं.
२) प्रोटीन
प्रोटीनच्या मदतीनं तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीरातील चरबी लवकर कमी करण्यास मदत मिळते. प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या डाळींचं सेवन करू शकता. मूग, तूर डाळीत भरपूर प्रोटीन असतं.
३) भात आणि चपाती
वजन कमी करण्यासाठी गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरी आणि ज्वारीची भाकरी खावी. तर भातासाठी पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राइसचा वापर करावा.
४) हेल्दी फॅट
हेल्दी फॅटमुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळेही वजन कमी करण्यास मदत मिळते. यासाठी बदाम, अक्रोड, चिया सीड्स खाऊ शकता.
५) सूप आणि ताक
वेगवेगळ्या भाज्यांचे सूप वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. पालक, टोमॅटो आणि गाजराचा सूप पिऊ शकता. तसेच जेवण झाल्यावर एक ग्लास ताकही पिऊ शकता. यानंही वजन कमी होण्यास मदत मिळते.