Join us  

१ महिना रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? पोषणतज्ज्ञ सांगतात रात्री न जेवल्याचे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 1:51 PM

What Will Happen If You Skip Dinner For 30 Day : रात्रीचं न जेवल्यामुळे शारीरिक कमकुवतपणा येऊ शकतो. असं केल्यानं काही लोकांना चक्कर येण्याचा  त्रास होतो

दिवसभर घरी आणि बाहेर काम केल्यानंतर रात्री प्रत्येकालच एक उत्तम जेवण करावंस वाटतं. ज्यामुळे फक्त भूक मिटत नाही तर शरीराला एनर्जीसुद्धा मिळते. (Weight Loss Tips) काहीजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात रात्री कमी खातात तर काहीजण रात्रीचं जेवण सोडतात. रात्रीचं जेवण  स्किप केलं म्हणजेच महिनाभर तुम्ही रात्रीचं जेवण केलंच नाही तर शरीरावर याचा काय परिणाम होईल ते समजून घेऊ. एक महिना डिनर स्किप केल्यानं शरीरावर काय परिणाम होतो ते समजून घेऊ. (If You Skip Dinner For 30 Days What Will Happen To Your Body One Month Challenge Intermittent Fasting)

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार रात्रीचे जेवण वगळल्यानं भाज्या, हिरव्या भाज्या आणि बिन्स, डेअरी उत्पादनं, फूड सीफूड यांसारखे गुण कमी होतात. एक किंवा त्यापेक्षा अधिक जेवण वगळल्यास एकून भाज्या, संपूर्ण धान्य आणि शुद्धा धान्य यांचे आपल्या आहारातील प्रमाण वाढवा. जेवण स्किप केल्यानं एनर्जी इन्टेक कमी होतो.  याचा तब्येतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

Navratri Special : नवरात्रीत 5 मिनिटांत काढून होतील पट्टीच्या रांगोळी डिजाईन्स; लक्ष्मीच्या पाऊलांनी सजवा दार

इंटरमिटेंट फास्टींग काय आहे?

सध्या इंटरमिटेंट फास्टींगचा क्रेझ वाढला आहे. हे फॉलो करण्यासाठी लोक १२ ते १५ तास काहीच खात नाहीत. याचा अर्थ असा आहे की उरलेल्या वेळेत लोकांना कंम्पलीट मील घ्यायला हवं. असं केल्यानं ३० दिवसं डिनर स्किप करण्याचं चॅलेंन्ज पूर्ण करू शकता. भारताचे प्रसिद्ध न्युट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्यामते जर तुम्ही रात्रीचं जेवण न करता इंटरमिटेंट फास्टींग केले तर एक महिन्यानंतर तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. या पद्धतीनं हळूहळू वजन कमी होऊ लागतं, डायबिटीसचा धोका कमी होतो, हार्ट अटॅकचा धोका नसतो, रक्ताच्या नसांमधून बॅड कोलेस्टेरॉल कमी होते, हाय ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवत नाही.  शरीराचे मेटाबॉलिझ्म बुस्ट होते. 

न्युट्रिशनिस्ट निखिल वस्त सांगतात की इंटरमिटेंट फास्टींगचे फायदे आहेत. हे उपाय प्रत्येक व्यक्तीसाठी परफेक्ट ठरू शकतात. पण काहींना शारीरिक नुकसानाचा सामना करावा लागतो.  रात्रीचं जेवण सोडल्यानं मेंदूवर चुकीचा परिणाम होतो, यामुळे तुम्हाला चिडचिडेपणा येऊ शकतो, जेवण सोडण्याच्या सवयीमुळे ब्लड शुगर लेव्हल डाऊन होऊ शकते.

साखर खाणं पूर्णपणे सोडलं तर शरीरात कोणते बदल दिसतात? डॉक्टर सांगतात साखर सोडल्याचे परिणाम.....

रात्रीचं न जेवल्यामुळे शारीरिक कमकुवतपणा येऊ शकतो. असं केल्यानं काही लोकांना चक्कर येण्याचा  त्रास होतो.  शरीरात व्हिटामीन्स, मिनरल्ससह अनेक पोषक तत्वांची कमतरता भासते. जर तुम्हाला इतर हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील तर इंटरमिटेंट फास्टींग अजिबात करू नका.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य