फळं खाणं तब्येतीसाठी उत्तम मानले जाते. पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली फळं शरीराला निरोगी ठेवतात आणि आजारांनाही दूर ठेवतात. (Eating too much fruit side effects) फळं खाल्ल्याने शरीराला प्रोटीन कॅल्शियम अशी पोषक तत्व मिळतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक जास्तीत जास्त फळं खाण्यावर भर देतात. ७२ तास म्हणजेच ३ दिवस फक्त फळं खाल्ल्याने शरीराला व्हिटामीन्स आणि खनिज मिळतील पण शरीरावर वेगळ्या पद्धतीनेही परिणाम जाणवू शकतो. (What will happen when you only eat fruits for 72 hours Experts said the advantages and disadvantages)
इंस्टाग्रामवर मेडिसिन बाय नेचर या पेजवर दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही ७२ तास फक्त फळं खाल्ली तर शरीरावर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पद्धतीने परिणाम होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन उत्तम ठरते २४ तास तुम्ही फळाचे सेवन केले तर शरीरातील फॅट्स हळूहळू बर्न होण्यास मदत होईल. शरीर किटोसिस या स्थितीत प्रवेश करेल आणि उर्जेच्या स्वरूपात शरीरातील फॅट्सचा वापर करेल. (Benefits of eating fruits everyday)
डॉ. पंकज वर्मा यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना सांगितले की, फक्त फळं खाल्ल्याने शरीरावर सकारात्मक आणि नकाराकात्मक दोन्ही प्रकार परिणाम होऊ शकतो. शरीरातील एंटी ऑक्सिडेंट्स, फायबर्सचे प्रमाण वाढेल, उर्जा वाढेल. फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरात डिहायड्रेशची समस्या जाणवणार नाही.
पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी
सतत फळांचे सेवन केल्यानं शरीराल प्रोटीन्स, फॅट्स यांसारख्या पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. प्रोटीन मांसपेशींना मेंटेन करण्यासाठी आवश्यक असते. हे हॉर्मोन उत्पादनासह शरीराच्या इतर कार्यांसाठी आवश्यक असते. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. सतत फळांचे सेवन केल्यानं ब्लड शुगर स्तरात चढ उतार होऊ शकतो. यामुळे एकाग्रता कमी होऊ शकते कोणत्याही कामात लक्ष लागत नाही.
७२ तास फक्त फळं खाण्याचे धोके
१) सतत फळांचे सेवन केल्याने वजन वाढण्याचाही धोका असतो कारण यात नैसर्गिक साखर असते
२) डायबिटीससारख्या समस्या, दात किडण्याची समस्या वाढू शकते.
३) जास्त फळांचे सेवन केल्यानं शरीरात पोषक तत्वांची कमतरता उद्भवते
४) फळांचे अतिसेवन केल्यास पोट फुगण्याची समस्याही उद्भवते.