सध्याच्या काळात वाढते वजन ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करुन बघतात. वजन कमी करण्यासाठी बहुतेकजण डाएट आणि एक्सरसाइजचा आधार घेतात. या दोन मुख्य गोष्टी व्यवस्थित फॉलो केले तर नक्कीच आपल्याला वाढलेले वजन अगदी सहजरित्या कमी करता येऊ शकते. असे असले तरीही खूप लोकांना डाएट करायचे म्हणजे नेमके काय करायचे हेच माहित नसते. डाएट फॉलो करताना कोणत्या गोष्टी खाव्यात आणि खाऊ नये याकडे जास्त बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते(Chapati for Weight Loss).
बरेचदा वजन कमी करण्यासाठी कार्बचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बहुतेक लोक गव्हाच्या पीठाची चपाती खाणे बंद करतात. हे पीठ कर्बोदकांनी समृद्ध असे असते. गव्हाच्या पिठामध्ये रिफाईंड कार्ब असतात, ज्यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाऐवजी इतर पिठांपासून (How to Choose the Right Atta for Weight Loss for Best Results?) तयार केलेली चपाती आपल्या डाएटमध्ये समावेश करु शकतो. पोळी-भाजी हा आपल्याकडील आहारातले मुख्य घटक. पण मग वजन कमी करण्यासाठी पोळी (4 Best Type of Rotis to Boost Weight Loss) ही उपयुक्त नाही म्हणून पोळी खाण्याचं टाळलं तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यापेक्षा आपण रोजच्या जेवणात जी पोळी खातो ती अधिक फायबरयुक्त आणि कमी कॅलरी असलेली कशी असेल याचा विचार करावा. केवळ गव्हाची पोळी खाणं ही त्यातील ग्लुटेन घटकामुळे वजन वाढीसाठी कारणीभूत ठरते. पण पोळी आपल्या आहारातून काढून न टाकता हीच पोळी वेगळ्या प्रकारे करुन वजन (Which Atta is Good For Your Health & Weight Loss?) कमी करता येऊ शकत(4 types of atta that are weight loss friendly).
गव्हाच्या पिठाऐवजी नेमक्या कोणत्या पिठाचा वापर करावा ?
१. बाजरी :- बाजरीची भाकरी आपण नेहेमीच खातो. विशेषत: थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली जाते. याच बाजरीच्या पिठाचा वापर करुन आपण पोळी देखील बनवू शकतो. बाजरीच्या पिठाची पोळी ही ग्लूटेन फ्री असते. त्यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. प्रथिनं, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे पोषक घटक बाजरीच्या पीठातून मिळतात. शिवाय बाजरीच्या पिठाची पोळी खाल्ल्यास पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. त्यामुळे सतत भूक लागत नाही. बाजरीच्या पिठाची पोळी करताना अर्धा कप बाजरीचं पीठ आणि तेवढीच कणिक घ्यावी. दोन्ही पिठं एकत्र करुन पीठ भिजवावं आणि पोळ्या कराव्यात. बाजरीच्या पिठाची पोळी खूप चविष्ट लागते. ही पोळी रोजच्या जेवणात असल्यास कमी काळात वजन कमी होण्यास मदत होते.
कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...
२. ओट्स :- ओटस हे वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अनेक पोषकतत्वे असतात. जर आपल्याला वजन कमी करायचे असले तर आहारात ओट्सच्या पिठापासून बनवलेल्या पोळ्या खाण्याला प्राधान्य दयावे. यामुळे वजन आणि मधुमेह हे दोन्ही नियंत्रणात राहते.
तापसी पन्नू सांगते ‘सनसेट ड्रिंक’ची खास रेसिपी, वाढलेलं वजन कमी करण्याचा तिचा स्पेशल उपाय...
३. ज्वारी :- ज्वारीच्या पिठामुळे वजन कमी होतं. ज्वारीचं पीठ ग्लूटेन फ्री तर असतंच सोबतच त्यात पचनाला मदत करणारे फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, ब आणि क जीवनसत्त्वं असतात. जे शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे या पिठाची पोळी खाल्ल्याने वजन तर कमी होतंच सोबतच ज्वारीतल्या गुणधर्मामुळे पचन क्रिया सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित रहाते. ज्वारीच्या पिठाची पोळी करताना अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप कणिक घ्यावी. ही दोन्ही पिठं एकत्र करुन पीठ मळून घ्यावं आणि पोळ्या कराव्यात.
वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...
४. नाचणी :- नाचणी ही निरोगी आणि पारंपारिक धान्यांपैकी एक आहे. नाचणी लोह, कॅल्शियम आणि फायबरचे मुख्य स्त्रोत आहे, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. जर, आपल्याला वजन कमी करायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. कारण नाचणी आपली भूक नियंत्रित करण्याबरोबरच बर्याच काळासाठी पोट भरलेले राहते. नाचणी सहज पचते आणि रोजच्या आहारात घेण्यास पौष्टिकही असते.
भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...