Join us  

रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं? उत्तम आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 2:40 PM

Which Cooking Oil Is Better According to Nutritionist : स्वयंपाकाच्या तेलाबाबत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न...

तेल हा आपल्या स्वयंपाकातील एक महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी, एखादा पदार्थ तळण्यासाठी किंवा अगदी पोळी, डोसा भाजण्यासाठीही आपण तेलाचा वापर करतो. आता रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरलेलं सर्वात चांगलं असा प्रश्न आपल्याला कायम तेल गरजेचे असल्याने ते वापरावेच लागते, पण ते योग्य प्रमाणात वापरले तर ठिक नाहीतर आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो. सतत तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. तसेच योग्य दर्जाचे तेल वापरणेही तितकेच महत्त्वाचे असते (Which Cooking Oil Is Better According to Nutritionist). 

बाजारात विविध प्रकारची, वेगवेगळ्या बियांपासून केलेली तेलं मिळतात. त्यातलं नेमकं कोणत्या कंपनीचं तेल चांगलं? आरोग्यासाठी फिल्टर केलेलं की कमी फिल्टर केलेलं तेल वापरावं? असे अनेक प्रश्न आपल्याला सर्रास पडत असतात. याच प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ख्याती रुपाणी यांनी केला आहे. तेल वापरण्याबाबत त्या काय सल्ले देतात पाहूया...

१. अनेकदा आपण किराणा सामान भरताना ५ किंवा १० लिटरचे कॅन आणून ठेवतो. मात्र तसे न करता १ लिटरच्या पिशव्या किंवा कॅन आणायला हवेत. म्हणजे १ लिटर तेल वापरल्यानंतर ते बदलता येते. 

२. आधी १ लिटर सनफ्लॉवर वापरले तर नंतर दाण्याचे, सोयाबिनचे असे दर काही दिवसांनी तेल बदलायला हवे. म्हणजे वर्षभरात आपण साधारण ६ ते ७ प्रकारची वेगवेगळे तेल आहारात घेतो. 

३. दर काही दिवसांनी तेलामध्ये बदल करण्याचा फायदा असा की आपल्या शरीराला त्यामुळे इसेन्शियल फॅटी अॅसिड मिळतात. जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. 

४. कोल्ड प्रेस ऑईल किंवा फ्लॅक्स सिड ऑईल, ऑलिव्ह ऑईल वापरावे का असा प्रश्न अनेकांना पडतो. पण तळण्यासाठी किंवा तडका देण्यासाठी रिफाईंड ऑईल जास्त चांगले असते. 

५. मात्र कोल्ड तुमच्या आहारात आणि शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर तुम्हाला आवर्जून कोल्ड प्रेस ऑईलमध्ये स्वयंपाक करायला सांगितला जातो. मात्र तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊनच आहारात बदल करायला हवेत.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.