Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > गहू-ज्वारी-बाजरी बंद करुन ओट्सची पोळी खाल्ली तर खरंच वजन कमी होतं?

गहू-ज्वारी-बाजरी बंद करुन ओट्सची पोळी खाल्ली तर खरंच वजन कमी होतं?

Which Flour Is Good for Weight loss : गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी खाण्यापेक्षा हा प्रयोग करुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 09:17 AM2023-07-19T09:17:59+5:302023-07-19T17:59:02+5:30

Which Flour Is Good for Weight loss : गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी खाण्यापेक्षा हा प्रयोग करुन पाहा...

Which Flour Is Good for Weight loss : If you want to lose weight, which flour should be eaten, you will stay slim-trim | गहू-ज्वारी-बाजरी बंद करुन ओट्सची पोळी खाल्ली तर खरंच वजन कमी होतं?

गहू-ज्वारी-बाजरी बंद करुन ओट्सची पोळी खाल्ली तर खरंच वजन कमी होतं?

वाढलेलं वजन कमी करणं हा सध्या अनेकांपुढील एक मोठा टास्क झाला आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायाम न करणे आणि ताणतणाव यांमुळे वजन वाढण्याच्या समस्येत गेल्या काही वर्षात वेगाने वाढ झाली आहे. एकदा वजन वाढायला सुरुवात झाली की त्यावर नियंत्रण मिळवणं अतिशय अवघड असतं. मग व्यायाम, आहाराचे नियम आणि इतरही काही गोष्टी करुन हे वजन घटवले जाते. कारण वाढत्या वजनाबरोबर बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्या मागे लागण्याची शक्यता असते. दिर्घकाळ आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर वजन नियंत्रणात ठेवण्याला पर्याय नाही हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. अन्यथा वेळ हातातून निघून गेल्यावर आपण काहीच करु शकत नाही (Which Flour Is Good for Weight loss).

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला आहार आणि तोंडावर असणारा ताबा. जीभेचे चोचले काही प्रमाणात कमी केले आणि शरीराला आवश्यक असणारा योग्य आहार योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतला तर आपले वजन नक्कीच कमी व्हायला मदत होऊ शकते. मात्र त्यासाठी स्वत:वर नियंत्रण असायला हवे. एकदा आपल्याला आहाराचे महत्त्व पटले की मग आपल्यासमोर कितीही आवडीचे आणि कॅलरी वाढवणारे पदार्थ ठेवले तरी आपण त्याला हातही लावत नाही. यासाठी नेमके काय करायचे तेच अनेकांना माहित नसते. वजन कमी करायचे म्हणून बरेच जण पोळी आणि भात खाणे सोडतात आणि फक्त फळं, सॅलेड, ज्यूस आणि प्रोटीन असा आहार घेतात. मात्र हे काही दिवस टिकते आणि पुन्हा आपण आपल्या पूर्वपदावर येतो. 

त्यापेक्षा आहारात बदल करायचे असतील तर रोडच्या गव्हाच्या किंवा ज्वारी-बाजरीच्या भाकरीपेक्षा ओटसच्या रोटीचा आहारात समावेश करायला हवा. आपण गव्हाचे पीठ करतो त्याचप्रमाणे ओट्सचे पीठ असते. ओट्स ग्लुटेन फ्री असल्याने सोल्यूबल फायबरचा उत्तम स्त्रोत म्हणून ते ओळखले जातात. यामध्ये आपण नेहमीचे दुसरे कोणते पीठ काही प्रमाणात मिसळू शकतो. याचा रंग पांढरा असून त्याचे पीठ थोडेसे रवाळ असते. म्हणूनच दुसरे कोणते पीठ मिसळल्यास पोळ्या करणे आणि खाणे सोयीचे होते.

ओट्सचे फायदे

१. कोलेस्टेरॉल आणि शुगर

ओटसमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. यातील पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आपण रोजच्या जेवणात ओटसचा योग्य प्रमाणात समावेश नक्कीच करु शकतो. 

२. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत 

ओट्सच्या पीठात असणारे अँटीऑक्सिडंटस रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. रक्तदाब वाढल्यास आरोग्याच्या कित्येक समस्या वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे ओट्सचा समावेश करायला हवा. 

(Image : Google)
(Image : Google)

३. पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत 

ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास आणि नको असलेला भाग बाहेर टाकण्यास याचा चांगला उपयोग होतो. यातील बीटा ग्लुकन पोटातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी उपयुक्त असतात. बद्धकोष्ठता किंवा पचनाशी निगडीत तक्रारी दूर होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

४. वजन कमी करण्यास उपयुक्त 

यातील फायबर आणि कार्बोहायड्रेटसमुळे शरीराचे पोषण तर होतेच तसेच पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. ओट्समुळे पोट पटकन भरते आणि त्यामुळे दिर्घकाळ खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळेच नकळत वजन कमी होण्यासाठी ओटस फायदेशीर ठरतात. 


 

Web Title: Which Flour Is Good for Weight loss : If you want to lose weight, which flour should be eaten, you will stay slim-trim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.