Join us  

वजन कमी करण्यासाठी दही की ताक काय आहे बेस्ट ? आहारतज्ज्ञ देतात महत्वाचा सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 12:15 PM

Which is more helpful for weight loss, curds or buttermilk : अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो दही खावे की ताक प्यावे ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावं.

वजन कमी करण्यासाठी आपण आहारात लो कॅलरीज असलेले पदार्थ खाणे पसंत करतो. रोजच्या डाएटमध्ये कमी कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याने वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी बहुतेकवेळा दही व ताक (Which is more helpful for weight loss, curds or buttermilk) यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर, दही व ताक हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रोजच्या आहारात दही व ताकाचा समावेश केल्याने फक्त वजनच कमी होत नाही तर शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात(Which is better between butter milk and curd).

डाएटमध्ये दही, ताकाचा समावेश केल्याने वजन कमी करण्यासोबतच पचनक्रियाही सुधारते. दही आणि ताक यातलं नेमकं काय प्यावं ? या दोन्हीपैकी आपल्या आरोग्याला काय जास्त फायदेशीर असते, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. काहीजणांना दही खायला आवडत तर काहीजण ताक पिणे पसंत करतात. नेमकं दही खावं का ताक (Reasons why buttermilk is best for weight loss) प्यावं यात बरेचजण कन्फ्युज असतात. डाएटिशियन गितांजली सिंह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे(Which is good for health, buttermilk or curd).

वजन कमी करण्यासाठी दही खावं की ताक प्यावं ? 

१. कमी कॅलरीज असतात - ताकामध्ये दह्यापेक्षा कमी कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ताक हा एक आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे.  

२. हायड्रेशन - ताकामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करताना आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. दह्याऐवजी ताक प्यायल्याने आपल्या शरीरात कमी कॅलरीज जातात. यासोबतच आपले पोट बऱ्याचकाळासाठी भरलेले आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते. 

लिंबू पाणी की ऍपल सायडर व्हिनेगर ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावे? आहारतज्ज्ञ सांगतात....

३. आरोग्यासाठी फायदेशीर - ताक आणि दही या दोन्हीमध्ये  प्रोबायोटिक्स असतात. शाकाहारी पदार्थांमध्ये हे दोन्ही पदार्थ प्रोबायोटिक्सचे उत्तम स्रोत आहेत. ज्यामुळे आपल्या शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढतात. त्याचबरोबर पचनक्रियेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत मिळते. यामुळे पचनाशी संबंधित आजार होत नाहीत.  

४. पोषण - ताक कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असते. वेटलॉस करण्यासाठी ताक हा उत्तम पर्याय आहे. डाएटिशियनच्या मते, ताक आणि दही हे दोन्ही आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. परंतु ताक बनवण्यासाठी दह्यात पाणी घालून ते घुसळले जाते तेव्हा त्याची गुणवत्ता अधिक वाढते. 

विद्या बालन करते  'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?  

वजन कमी करण्यासाठी काय उत्तम आहे ? 

आहारतज्ज्ञ गीतांजली सिंह म्हणतात, “वजन कमी करण्यासाठी दही आणि ताक हे दोन्ही चांगले पर्याय आहेत. परंतु, जर आपण कॅलरीजचा विचार केला असता, १०० ग्रॅम ताकामध्ये ४० कॅलरीज असतात तर १०० ग्रॅम दह्यामध्ये ९८ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दह्यापेक्षा ताक उत्तम आहे.

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यअन्न