Join us  

गायीम्हशीचे दूध प्यावे की अलमंड, सोया मिल्क? आरोग्यासाठी काय योग्य? बघा तज्ज्ञांचं नेमकं मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 3:23 PM

Health Tips: वेगवेगळ्या डाएट प्लॅननुसार आता गायी- म्हशीचे दूध किंवा दुधाचे वेगवेगळे प्रोडक्ट घेऊ नयेत, असा सल्ला दिला जातो. नेमकं काय खरं आणि काय खोटं? बघा तज्ज्ञ काय सांगतात..

ठळक मुद्देकाही प्लॅननुसार अमुक एक पदार्थ खाणं वर्ज्य असतं, तर दुसऱ्या प्लॅननुसार तोच पदार्थ खाणं पोषक मानलं जातं दुधाचं आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचंही तसंच आहे.

हल्ली अनेक जण आरोग्याबाबत, तब्येतीबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे मग फिट राहण्यासाठी ते वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. डाएट प्लॅनचेही अनेक प्रकार असून जवळपास प्रत्येक प्लॅन वेगवेगळा असतो. काही प्लॅननुसार अमुक एक पदार्थ खाणं वर्ज्य असतं, तर दुसऱ्या प्लॅननुसार तोच पदार्थ खाणं पोषक मानलं जातं (Animal milk or plant based milk? Which milk is better?). अशावेळी सामान्य माणूस गोंधळात पडतो आणि काय खावं आणि काय टाळावं, हेच कळत नाही. दुधाचं आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचंही तसंच आहे. म्हणूनच याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी एक खास पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

 

आजकाल वेगन डाएट खूप चर्चेत आहे. यामध्ये जनावरांचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य असतात. त्याला पर्याय म्हणून मग प्लान्ट बेस मिल्क म्हणजेच अलमंड मिल्क, सोया मिल्क, ओट्स मिल्क घेण्याचा सल्ला दिला जातो.

करवा चौथनिमित्त मौनी रॉयने काढलेल्या मेहंदीचे फोटो झाले जबरदस्त व्हायरल, बघा कसं होतं खास डिझाईन

पण ऋजुता यांच्यामते गायी- म्हशीच्या दुधासाठी असे प्लान्ट बेस मिल्क हा काही पर्याय होऊ शकत नाही. कारण गायी- म्हशीच्या दुधात जी पोषणमुल्ये असतात, ती प्लान्ट बेस मिल्कमध्ये नसतात. शिवाय आपल्या संस्कृतीत खूप पुर्वीपासूनच दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचे महत्त्व आहे. आपण ज्या वातावरणात राहतो, तेथे दूध पिणे हे नक्कीच आरोग्यदायी आहे. दूध आवडत नसेल तर पिऊ नका. पण त्याऐवजी प्लान्ट बेस मिल्कचे इतर महागडे पर्याय शोधणं हे काही योग्य नाही. दुधाऐवजी इतर दुग्धजन्य पदार्थ खा, त्यातून नक्कीच पोषण मिळेल, असं त्यांचं म्हणणं आहे.

 

दुधाविषयी हा गैरसमजही दूर कराथायरॉईड, पीसीओडी असे काही आजार असताना गायी- म्हशीचे दूध न पिण्याचा सल्ला दिला जातो. पण असं करणं टाळा.

दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश

पचत असेल, दूध प्यायलयाने कोणताही त्रास होत नसेल तर अवश्य दूध प्या, त्यातून निश्चितच पोषणच मिळेल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सदूध