भात हा बहुतांश लोकांना आवडणारा पदार्थ. मग गरमगरम तुप- मीठ- भात, साधं वरण भात आणि त्यावर पिळलेलं लिंबू, एखाद्या आंबट चवदार आमटीसोबतचा भात किंवा मग हिवाळ्यात, पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात असलेला गरमागरम मेतकुट भात आणि त्यावर तुपाची धार... असे भाताचे वेगवेगळे प्रकार (hot fresh rice) पाहिले की भातप्रेमींना (rice lover) त्याचा मोह आवरत नाही. पण सगळ्यांच्या आवडत्या भाताबद्दल मात्र नेहमीच वेगवेगळ्या गप्पा रंगत असतात. (stale or fresh? which rice is good for health for diabetes patients?)
भात खाल्ल्याने वजन वाढतं, भात खाल्ल्याने शुगर वाढते, रात्रीच्या वेळी भात खाऊच नये किंवा मग भात लवकर खराब होतो त्यामुळे सकाळचा भात रात्रीही खाऊ नये... असं काय काय भाताबाबत आपण नेहमीच ऐकत असतो. आता सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा यांनी भाताबद्दल आणखी एक विशेष माहिती दिली आहे. भात कसा खावा, असा प्रश्न विचारला तर बहुतांश लोकांचं हेच म्हणणं असणार की छान गरमागरम पहिल्या वाफेचा वाफाळता भात खावा. पण पुजा यांचं म्हणणं काही वेगळंच आहे. त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये मधुमेह आणि पीसीओएस असा त्रास असेल, तर कशा पद्धतीने भात खावा, हे त्यांनी सांगितलं आहे.
पुजा माखिजा यांच्या मते....तयार झालेला भात जेव्हा थंड होत जातो, तेव्हा त्यासोबत नैसर्गिकपणे एक क्रिया होत जाते. त्याला स्टार्च रेट्रोग्रेडेशन असं म्हणतात. या प्रक्रियेतून रेझिस्टन्स स्टार्च तयार होतात. शिजवलेला भात, उकडलेले बटाटे जेव्हा आपण थंड होतात, तेव्हा त्यातले डायजेस्टिव्ह स्टार्च हळूहळू रेझिस्टन्स स्टार्चमध्ये रुपांतरीत होत जातात. डायजेस्टिव्ह स्टार्च असे असतात की आपलं शरीर त्यांना सहजपणे ब्रेकडाऊन करतं आणि त्यामुळे त्याचं खूप लवकर ग्लुकोजमध्ये रुपांतर होतं. पण रेझिस्टीव्ह स्टार्च बॉडीला लवकर ब्रेकडाऊन करता येत नाहीत, त्यामुळे त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रेझिस्टिव्ह स्टार्च शरीरासाठी घातक नसतात. उलट गट हेल्थ सुधारण्यासाठी प्रो बायोटीक म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे ताज्या भातापेक्षा शिळा भात खाणं मधुमेह आणि पीसीओएस (PCOS) त्रास असणाऱ्यांसाठी चांगलं आहे, असं पुजा यांचं म्हणणं आहे.
कशा पद्धतीने खावा शिळा भात? (proper method of eating stale rice)- शिजवलेला भात फ्रिजमध्ये ठेवावा.- त्यानंतर तो तब्बल २४ तासांनी खाल्ला तरी चालतो, असं पुजा यांचं म्हणणं आहे.- फ्रिजमधून काढलेला भात आधी सामान्य तापमानावर येऊ द्यावा. त्यानंतर तो गरम करावा आणि मगच खावा.