Join us  

सद्गुरूंचा सल्ला, नियमित 'या' तांदूळाचा भात खा, तब्येतही सुधारेल आणि सतत येणारा थकवाही जाईल पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 5:03 PM

Which Rice Is Healthiest According To Sadhguru Jaggi Vasudev : तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते.

तांदूळ (Rice) एक असा आहार आहे जो भारतभरात मोठ्या प्रमाणात  खाल्ला जातो. तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचा असून त्याची चव आणि फायदेसुद्धा वेगवेगळे असतात. अशा स्थितीत सर्वात चांगले तांदूळ कोणते असा प्रश्न अनेकांना पडतो. भारताच्या  प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचा भात खाल्ला जातो. तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. याव्यतिरिक्त  यात फायबर्स, व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. (Which Rice Is Healthiest According To Sadhguru Jaggi Vasudev)

ईशा फाऊंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) यांनी  ब्लॅक कवुनी राईस सगळ्यात उत्तम असल्याचं सांगितलं आहे. हा एक प्रकारचा काळा तांदूळ आहे. ज्याची शेती तामिळनाडूमध्ये केली जाते. हे तांदूळ पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. हे तांदूळ खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात.

खोकला-कफ कमीच होत नाहीये? 2 दिवसांत छातीतला कफ बाहेर काढेल हा खास उपाय

 यात प्रोटीन, आयर्न, फायबर्स यांसारखी पोषक तत्व असतात. या तांदूळात एंटी ऑक्सिडेंट्स, एंथोसायनिन्स आणि फायबर्स असतात. हे खाल्ल्यानं एलडीएल कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करून ब्लड फ्लो सुधारतो आणि हृदयाच्या आजारांची जोखिम कमी करण्यास मदत होते. यामुळे कोरोनरी आर्टरी डिसिजपासून बचाव होतो. 

कवुनी तांदूळात एंथोसायनिन्स जास्त असते.  ज्याचा  गडद रंग एंटी ऑक्सिडेंट्ससाठी जबाबदार असतो. या तांदूळात  २३ प्रकारचे एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याशिवाय कॅन्सर, हार्ट डिसिजपासून बचाव होतो.

 तुळशीच्या लग्नासाठी भरकन काढता येतील १० आकर्षक रांगोळ्या; घराची वाढेल शोभा, दार खुलून दिसेल

यातील एंथोसायनिन्स तत्व शरीरातील सूजकमी करतात आणि सूज संबंधित विकारांपासून बचावासाठी फायदेशीर ठरतात. याच्या नियमित सेवनानं कॅन्सरपासून बचाव  होतो, खासकरून ब्रेस्ट कॅन्सर टाळता येतो. या तांदूळात उच्च प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे भूक कंट्रोल होण्यास मदत होते. वजनही नियंत्रणात राहतं. यात फायबर्स असल्यामुळे मल त्याग करण्यास मदत होते. गॅसेसपासून बचाव होतो आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते.

हे तांदूळ लोहानं परीपूर्ण असतात.  जे हिमोग्लोबीन बनवण्यासाठी आणि एनिमिया टाळण्यासाठी आवश्यक असते. खासकरून अशा लोकांसाठी जे आयर्नच्या कमतरतेचा सामना करत आहेत. याच्या सेवनानं डायबिटीसच्या रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासही मदत होते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स