Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज स्वयंपाकात कोणतं मीठ वापरता? साधं मीठ की सैधव मीठ; कोणतं जास्त फायदेशीर

रोज स्वयंपाकात कोणतं मीठ वापरता? साधं मीठ की सैधव मीठ; कोणतं जास्त फायदेशीर

Which Salt Should be Used In Food Common Or Rock Salt : दोन्हींपैकी कोणतं मीठ आरोग्यासाठी जास्त उत्तम ठरतं ते समजून घेऊ. साधं मीठ आणि सैंधव मीठात  काय फरक आहे ते समजून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 02:35 PM2023-09-29T14:35:20+5:302023-09-29T23:43:24+5:30

Which Salt Should be Used In Food Common Or Rock Salt : दोन्हींपैकी कोणतं मीठ आरोग्यासाठी जास्त उत्तम ठरतं ते समजून घेऊ. साधं मीठ आणि सैंधव मीठात  काय फरक आहे ते समजून घेऊ.

Which Salt Should be Used In Food Common Or Rock Salt : Why you should not replace iodised salt with rock salt | रोज स्वयंपाकात कोणतं मीठ वापरता? साधं मीठ की सैधव मीठ; कोणतं जास्त फायदेशीर

रोज स्वयंपाकात कोणतं मीठ वापरता? साधं मीठ की सैधव मीठ; कोणतं जास्त फायदेशीर

मीठ (Salt) आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे.  मीठाशिवाय जेवण अळणी लागते. बाजारात दोन प्रकारचे मीठ मिळतात एक साधं मीठ आणि दुसरं सैंधव मीठ. साध्या मीठात सोडीयमचे प्रमाण जास्त असते. सैंधव मीठात पोटॅशियम जास्त असते. दोन्हींपैकी कोणतं मीठ आरोग्यासाठी जास्त उत्तम ठरतं?  साधं मीठ आणि सैंधव मिठात  काय फरक आहे ते समजून घेऊ. (Which Salt Should be Used In Food Common Or Rock Salt)

साधं मीठ आणि सैंधव मीठ या दोन्हींचे महत्व वेगवेगळे आहे. चांगल्या आरोग्यासाठी सैंधव मीठ अधिक फायदेशीर मानलं जातं.  साध्या मिठात सोडियम जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे घाम खूप येतो. शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय सैंधव मीठात पोटॅशियम जास्त असतं त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. (Why you should not replace iodised salt with rock salt)

सैंधव मीठ कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने परिपूर्ण असते. हाडांसाठीही फायदेशीर ठरते.  यामुळे उच्च रक्तदाब आणि मधूमेह असलेल्या रुग्णांनी सैंधव मिठाचे सेवन करायला हवे. साध्या मिठाच्या तुलनेत सैंधव मीठ  आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं. 

हाडं चांगली राहतात

सैंधव मिठात सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदयाच्या आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतो. ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त सैंधव मीठात मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखी खनिजं  असतात. ज्यामुळे हाडं चांगली राहतात. 

रोज नाश्त्याला काय खाता? माधुरीचे पती डॉ. नेने सांगतात नाश्ता करण्याच्या ५ टिप्स- निरोगी राहाल

डोकेदुखीपासून आराम मिळतो.

सैंधव मीठाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि उर्जासुद्धा वाढते. डोकेदुखी, सायनस,  गॅस यांसारख्या समस्या टाळण्यासाठी, झोपेच गुणवत्ता सुधारण्यासाठी  सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. 

१ महिना भात न खाल्ल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल, तज्ज्ञ सांगतात भात न खाण्याचे परिणाम

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर 

सैंधव मीठ त्वचा आणि केसासांठी फायदेशीर ठरते.  पण याचे योग्य प्रमाणातच सेवन करायला हवे. जास्त मीठ खाल्ल्यास शरीराचं नुकसान होऊ शकतं. सैंधव मीठात अनेक महत्वाची पोषक तत्व असतात ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे साधारण मीठाच्या तुलनेत सैंधव मीठ अधिक गुणकारी ठरते. 

Web Title: Which Salt Should be Used In Food Common Or Rock Salt : Why you should not replace iodised salt with rock salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.