Join us  

४ वाजता चहा घेतल्याशिवाय चैन पडत नाही? तज्ज्ञ सांगतात, संध्याकाळचा चहा कोणी घ्यावा, कोणी घेऊ नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 2:15 PM

Who Can Have and Not Have Tea In The Evening : ४ वाजताचा चहा कोणी घेतलेला चालतो आणि कोणी घेऊ नये याविषयी..

ठळक मुद्दे४ चा चहा घेतल्याशिवाय चैन पडत नाही? पण...चहाची तल्लफ येते, पण कोणी घ्यावा आणि कोणी टाळावा याविषयी...

चहा ही आपल्याकडे अमृतासारखी गोष्ट असून सकाळी उठल्यावर अनेकांना सगळ्यात आधी चहा लागतो. कधी एखाद्याला भेटायचे असेल किंवा कोणाच्या घरी गेलो की अगदी अवश्य घेतली जाणारी गोष्ट म्हणजे चहा. थंडीच्या दिवसांत तर गरमागरम वाफाळता चहा घ्यायची आपल्याला आवर्जून इच्छा होते. आपण सकाळी उठल्यावर किंवा नाश्ता झाल्यावर तर चहा घेतोच. पण दिवसभर काम करुन थकल्यासारखे वाटल्यावर ४ वाजता तर आपल्याला आवर्जून चहा लागतोच. थकवा जाण्यासाठी आणि थोडी तरतरी वाटण्यासाठी ४ वाजताचा चहा म्हणजे अनेकांसाठी एनर्जी बूस्टर असतो (Who Can Have and Not Have Tea In The Evening). 

एकदा या चहाची सवय लागली की ती जाणे अवघड गोष्ट असते. म्हणूनच ४ वाजता चहा घेणे आरोग्यासाठी चांगले असते का? हा चहा कोणी घ्यावा आणि कोणी घेऊ नये याविषयी आपल्याला विशेष माहिती असतेच असे नाही. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार अशाप्रकारे ४ वाजताचा चहा घेणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. इन्स्टाग्रामवर त्या याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. ४ वाजताचा चहा कोणी घेतलेला चालतो आणि कोणी घेऊ नये याविषयी त्या या पोस्टमध्ये काय सांगतात पाहूया..

१. मेडीकल सायन्सनुसार झोपेच्या १० तास आधी चहा न घेतलेला केव्हाही चांगला. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. 

२. पचनक्रिया सुरळीत राहावी, लिव्हर चांगल्या पद्धतीने डिटॉक्स व्हावी आणि शरीराचा दाह कमी व्हावा यासाठी शक्यतो ४ वाजताचा चहा घेणे टाळावे. 

३. भारतातील ६४ टक्के लोकांना चहा प्यायला आवडतो आणि ३० टक्के लोक आवर्जून संध्याकाळचा चहा घेणे पसंत करतात. 

४ वाजताचा चहा कोणी घ्यावा? 

१. नाईट शिफ्ट करणारे२. ज्यांना अॅसिडीटी किंवा गॅसेसच्या तक्रारी नाहीत३. ज्यांची पचनक्रिया चांगली आहे४. ज्यांना एखादवेळी ४ वाजताचा चहा नसला तरी चालतो ५. ज्यांना झोपेशी निगडीत तक्रारी नाहीत.६. जे नियमित वेळेत जेवतात.७. जे अर्धा कप किंवा त्याहून कमी चहा घेतात. 

४ चा चहा कोणी टाळायसा हवा ? 

१. ज्यांना झोपेशी निगडीत तक्रारी आहेत २. ज्यांना खूप ताण आहेत. ३. ज्यांना वाताचा त्रास आहे४. ज्यांना वजन वाढवायचे आहे५. ज्यांची पचनक्रिया सुरळीत नाही६. ज्यांना हार्मोन्सशी निगडीत तक्रारी आहेत७. ज्यांना बद्धकोष्ठता, अॅसिडीटीच्या तक्रारी आहेत८. ज्यांचे वजन कमी आहे९. ज्यांना आपली त्वचा आणि केस चांगले हवेत  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजना