Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > 'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी गूळ खाऊ नये, बघा गूळ खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती 

'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी गूळ खाऊ नये, बघा गूळ खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती 

Who Should Avoid Eating Jaggery: हिवाळ्यात गूळ खाणं अतिशय आरोग्यदायी आहे. पण कोणत्या व्यक्तींनी गूळ खाऊ नये किंवा कमी प्रमाणात खावा तसेच गूळ खाण्याची योग्य पद्धत कोणती... ते पाहूया...(Proper method of eating jaggery or gul)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 01:53 PM2023-11-21T13:53:04+5:302023-11-21T13:54:00+5:30

Who Should Avoid Eating Jaggery: हिवाळ्यात गूळ खाणं अतिशय आरोग्यदायी आहे. पण कोणत्या व्यक्तींनी गूळ खाऊ नये किंवा कमी प्रमाणात खावा तसेच गूळ खाण्याची योग्य पद्धत कोणती... ते पाहूया...(Proper method of eating jaggery or gul)

Who should avoid eating jaggery? Benefits of eating jaggery or gud, Proper method of eating jaggery or gul, 5 best ways to consume jaggery | 'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी गूळ खाऊ नये, बघा गूळ खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती 

'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी गूळ खाऊ नये, बघा गूळ खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती 

Highlightsगूळ खाण्याच्या देखील काही विशिष्ट पद्धती आहेत. त्यानुसार तो खाल्ला तर शरीरासाठी तो अधिक लाभदायक ठरतो.

गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. शिवाय गूळ उष्ण असल्याने हिवाळ्याच्या दिवसांत तर आवर्जून गूळ खायलाच पाहिजे, असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. गुळाचे शरीराला एवढे फायदे आहेत की त्याला हिवाळ्यातलं सूपरफुड म्हणून ओळखलं जातं ( Benefits of eating jaggery or gud). पण तरीही असा हा पौष्टिक गूळ खाणं सरसकट सगळ्यांसाठीच फायदेशीर असतो, असं नाही. तब्येतीच्या काही तक्रारी असतील, तर अशा लोकांनी गूळ खाणं टाळायलाच पाहिजे (Who should avoid eating jaggery?). किंवा कमी प्रमाणात खाल्ला पाहिजे. शिवाय गूळ खाण्याच्या देखील काही विशिष्ट पद्धती आहेत. त्यानुसार तो खाल्ला तर शरीरासाठी तो अधिक लाभदायक ठरतो. (5 best ways to comsume jaggery)

 

कोणत्या व्यक्तींनी गूळ खाणं टाळावं?

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. दंग आणि साक्षी ललवानी यांनी असं सांगितलं आहे की ज्या लोकांना मधुमेह आहे, त्या व्यक्तींनी गूळ खाणं टाळायला पाहिजे किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार कमी प्रमाणात खायला पाहिजे. कारण त्यामध्ये सुक्रोजचं प्रमाण भरपूर असतं. 

खत- पाणी वेळेवर देऊनही झाडं सुकत आहेत? ५ गोष्टी करून पाहा- सुकलेली रोपं पुन्हा नव्याने बहरतील

जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्या लोकांनीही गूळ खाऊ नये किंवा खूपच कमी प्रमाणात खावा. कारण गुळामध्ये भरपूर कॅलरी असतात.

ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा वारंवार अपचनाच्या तक्रारी जाणवतात, त्या लोकांनीही गूळ कमी प्रमाणात खावा.

 

गूळ खाण्याची योग्य पद्धत कोणती?

१. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितल्यानुसार रोज दुपारी जेवण झाल्यानंतर गुळाचा एक लहानसा खडा खावा. यामुळे पचन चांगले होते. 

२. आहारतज्ज्ञ विधी चावला यांनी सांगितले आहे की सकाळी अक्रोड, काजू, बदाम या सुकामेव्यासोबत गूळ खाणं चांगलं असतं.

केस खूपच रुक्ष- कोरडे झाले? ३ पदार्थ वापरून घरच्याघरी १० रुपयांत करा हेअर स्पा, केस होतील सिल्की- शाईनी

३. रात्री झोपताना गरम दूध गूळ टाकून प्यावं.

४. दिवसातून एकदा गुळाचा चहा पिणंही आरोग्यदायी मानलं जातं.

५. आलं, दालचिनी, लवंग टाकून गुळाचं पाणी उकळून घ्यावं. असा गुळाचा काढा घेतल्यानेही आरोग्याला बरेच फायदे होतात. 

 

Web Title: Who should avoid eating jaggery? Benefits of eating jaggery or gud, Proper method of eating jaggery or gul, 5 best ways to consume jaggery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.