Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > शुगर फ्री वापरणं ठरू शकतं जीवघेणं, WHO चा इशारा; शुगर आणि वजन कमी होण्याऐवजी वाढेल 

शुगर फ्री वापरणं ठरू शकतं जीवघेणं, WHO चा इशारा; शुगर आणि वजन कमी होण्याऐवजी वाढेल 

WHO warned against using non-sugar sweetners for weight loss :जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, संशोधनातून असं समोर आलं की  टाईप २ डायबिटीस, हृदयाच्या आजारांचा धोका वयस्कर लोकांमध्ये मृत्यू दर वाढवतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 05:20 PM2023-05-17T17:20:27+5:302023-05-17T17:47:18+5:30

WHO warned against using non-sugar sweetners for weight loss :जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, संशोधनातून असं समोर आलं की  टाईप २ डायबिटीस, हृदयाच्या आजारांचा धोका वयस्कर लोकांमध्ये मृत्यू दर वाढवतो.

WHO warned against using non-sugar sweetners for weight loss | शुगर फ्री वापरणं ठरू शकतं जीवघेणं, WHO चा इशारा; शुगर आणि वजन कमी होण्याऐवजी वाढेल 

शुगर फ्री वापरणं ठरू शकतं जीवघेणं, WHO चा इशारा; शुगर आणि वजन कमी होण्याऐवजी वाढेल 

वजन कमी करण्यासाठी लोक शुगर फ्री स्वीटनर्सचा वापर करतात. जर काहीजण साखर खाणच सोडून देतात. जागतिक आरोग्य संघटनेनं शरीराचं वजन नियंत्रित करण्यासाठी तसंच रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरात असलेले शुगर फ्री स्विटनर्स (कृत्रिमरित्या गोडवा निर्माण करणारे पदार्थ) न वापरण्याचा सल्ला दिला आहे.  संशोधनानुसार शुगर फ्री स्वीटनर्सचा वापर वयस्कर लोक, लहान मुलं करत असले तरी  वजन कमी करण्यासाठी याचा कोणताही फायदा होत नाही. (Limit use of artificial sweeteners; health experts support latest WHO guidelines) जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, संशोधनातून असं समोर आलं की  टाईप २ डायबिटीस, हृदयाच्या आजारांचा धोका वयस्कर लोकांमध्ये मृत्यू दर वाढवतो. (WHO warned against using non-sugar sweetner's for weight loss)

जागतिक आरोग्य संघटनेचे पोषण आणि खाद्यसुरक्षा प्रमुख फांसिस्को ब्रांका यांनी सांगितलं की कोणत्याही खाद्यपदार्थात किंवा पेय पदार्थात आर्टिफिशिल स्विटनर्स मिसळल्यास वजन कमी करण्यात कोणताही फायदा होत नाही. याऊलट लोकांनी इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, नैसर्गिकरित्या गोड असलेले पदार्थ खाणे, जसे की फळे किंवा गोड न केलेले पदार्थ आणि पेये.

फांसिस्को ब्रांका  यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, NSS (कृत्रिम साखर) हा आहारातील आवश्यक घटक नाही आणि त्याचे कोणतेही पौष्टिक मूल्य नाही.  लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जीवनाच्या सुरुवातीपासूनच आहारातील गोड पदार्थांचे प्रमाण कमी करावे. डब्लूएचओच्या मते आर्टिफिशयल स्वीटनर्सचा वापर केल्यानं कॅन्सर किंवा हृदयरोगही उद्भवू शकतो. याचे शरीराला कोणतेही फायदे मिळत नाहीत.

न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवाणी यांनी एका इंग्लिश वेबसाईटला माहिती देताना सांगितले की कृत्रिम गोड पदार्थ इंसुलिनची पातळी आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणात व्यत्यय आणू शकतात.  कृत्रिम स्वीटनर्स साखरेपेक्षा गोड, परंतु कॅलरीजशिवाय डिझाइन केलेले आहेत. यामुळे गोड पदार्थांचे अतिसेवन होऊ शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते.

स्तन बेढब, ओघळल्यासारखे दिसतात? कायम सुडौल, मेंटेन दिसायचंय तर ५ टिप्स लक्षात ठेवा

 इतर नकारात्मक आरोग्य परिणाम होऊ शकतात. शिवाय, काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की कृत्रिम गोड पदार्थ टाइप 2 मधुमेहाच्या वाढीव जोखमीशी जोडलेले असू शकतात, कारण ते इंसुलिनच्या पातळीत आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणात व्यत्यय आणू शकतात." 

Web Title: WHO warned against using non-sugar sweetners for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.