Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > विराट कोहली- अनुष्का शर्मा- अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी जेवतात सायंकाळी सातच्या आत कारण..

विराट कोहली- अनुष्का शर्मा- अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी जेवतात सायंकाळी सातच्या आत कारण..

5 Amazing Health Benefits Of Eating Early Dinner: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ च्या नंतर घेणं टाळलं तर त्याचे वेटलॉससह इतरही अनेक फायदे आहेत...(weight loss tips)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2024 05:35 PM2024-07-08T17:35:06+5:302024-07-08T18:39:30+5:30

5 Amazing Health Benefits Of Eating Early Dinner: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ च्या नंतर घेणं टाळलं तर त्याचे वेटलॉससह इतरही अनेक फायदे आहेत...(weight loss tips)

why anushka sharma, virat kohli and other celebrities have dinner before 7 pm, 5 amazing health benefits of eating early dinner including weightloss | विराट कोहली- अनुष्का शर्मा- अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी जेवतात सायंकाळी सातच्या आत कारण..

विराट कोहली- अनुष्का शर्मा- अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी जेवतात सायंकाळी सातच्या आत कारण..

Highlightsरात्री लवकर जेवलं तर तुमची दुसऱ्या दिवशीची सकाळ निश्चितच अधिक फ्रेश आणि उत्साही असते. कारण रात्रीचं जेवण पुर्णपणे पचलेलं असतं. त्यामुळे ॲसिडीटी, अपचन असा कोणताही त्रास नसतो.

आपल्याला माहितीच आहे की क्रिकेटर विराट कोहली, त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, सोनम कपूर यांच्यासारखे अनेक सेलिब्रिटी असे आहेत की जे रात्री उशीरा जेवण करणं टाळतात. त्यांचं रात्रीचं जेवण सायंकाळी ६ किंवा ७ वाजेपर्यंत झालेलं असतं. या सेलिब्रिटींनी अनेकदा याविषयीची माहिती वेगवेगळ्या मुलाखतींमधून दिलेली आहे. ज्या वेळेला सर्वसामान्य घरात रात्रीच्या जेवणासाठी काय स्वयंपाक करायचा याची चर्चा चाललेली असते, त्या वेळेला या सेलिब्रिटींची जेवणं उरकलेलीही असतात. का करतात ते असं? काय नेमके फायदे होतात यामुळे? बघा याविषयीची खास माहिती.. (5 amazing health benefits of eating early dinner)

 

रात्रीचं जेवण सातच्या आधी करण्याचे फायदे

१. वेगवेगळे अभ्यासक, तज्ज्ञ मंडळी तसेच स्लीप फाउंडेशन यांनी केलेल्या अभ्यासानुसार रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये २ ते ४ तासांचं अंतर असलं पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला खाल्लेलं अन्न पचविण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

केस वाढतील भराभर होतील दाट, त्वचाही दिसेल सुंदर- तरुण, त्यासाठी फक्त ३ पदार्थ रोज खा 

२. खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन झालं की आपोआपच शरीरावर अतिरिक्त चरबी साचण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पोटावरची चरबी आणि वजन दोन्हीही वाढत नाही.

थेंबभरही तेल न घालता करा कैरीचं चटपटीत लोणचं- घ्या गावाकडची एकदम खास पारंपरिक रेसिपी

३. रात्री जेवून लगेच झोपलं तर बऱ्याचदा अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही. यामुळे मग रात्री अपचन, ॲसिडीटी असा त्रास होतो. याचा परिणाम झोपेवर होतो आणि शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर घेतल्यास शांत झोप येण्यास मदत होते. 

 

४. रात्रीचं जेवण नेहमीच उशीरा घेत असाल तर त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. कारण जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शारिरीक हालचाल मंदावते आणि जेवणातून मिळालेले फॅट शरीर व्यवस्थित पचवू शकत नाही. याचा परिणाम हृदयावरही होतो. 

पावसाळ्यात नेहमीच पोट बिघडतं? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात 'हे' पदार्थ नियमित खा, पोट राहील ठणठणीत 

५. रात्री लवकर जेवलं तर तुमची दुसऱ्या दिवशीची सकाळ निश्चितच अधिक फ्रेश आणि उत्साही असते. कारण रात्रीचं जेवण पुर्णपणे पचलेलं असतं. त्यामुळे ॲसिडीटी, अपचन असा कोणताही त्रास नसतो. शिवाय झोप व्यवस्थित झालेली असते. त्यामुळे पोट आणि शरीरही हलकं वाटतं. अंगातला जडपणा कमी होतो. 

 

Web Title: why anushka sharma, virat kohli and other celebrities have dinner before 7 pm, 5 amazing health benefits of eating early dinner including weightloss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.