Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > एक चूक आणि वजन वाढेल भराभर, तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी खाण्याची योग्य पद्धत - वजनात दिसेल फरक...

एक चूक आणि वजन वाढेल भराभर, तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी खाण्याची योग्य पद्धत - वजनात दिसेल फरक...

Why Chewing Food Slowly Is Important For Weight Loss : How chewing food well can help in weight loss : Does Eating Slowly Help You Lose Weight : Eating slower may help with weight loss : does chewing food more slowly actually help with weight loss : वेटलॉस करण्यासाठी काही नव्या सवयी स्वतःला लावून घेतल्या तर वजन कमी करणे सोपे होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 16:41 IST2025-04-23T16:23:41+5:302025-04-23T16:41:14+5:30

Why Chewing Food Slowly Is Important For Weight Loss : How chewing food well can help in weight loss : Does Eating Slowly Help You Lose Weight : Eating slower may help with weight loss : does chewing food more slowly actually help with weight loss : वेटलॉस करण्यासाठी काही नव्या सवयी स्वतःला लावून घेतल्या तर वजन कमी करणे सोपे होते...

Why Chewing Food Slowly Is Important For Weight Loss Eating slower may help with weight loss Does Eating Slowly Help You Lose Weight | एक चूक आणि वजन वाढेल भराभर, तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी खाण्याची योग्य पद्धत - वजनात दिसेल फरक...

एक चूक आणि वजन वाढेल भराभर, तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी खाण्याची योग्य पद्धत - वजनात दिसेल फरक...

वजन कमी करण्यासाठी आपण काहीवेळा आपल्या नेहमीच्या सवयी सोडून काही वेगळ्या गोष्टी ट्राय करून पाहतो. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज, डाएट तर फॉलो करतोच. वजन (Does Eating Slowly Help You Lose Weight) झटपट कमी करण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत (Why Chewing Food Slowly Is Important For Weight Loss) देखील बदल करतो. वेटलॉस करण्यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये थोडेफार बदल करून, काही नव्या गोष्टींची सवय स्वतःला लावून घेतली तर वजन कमी करणे सोपे होते. आपण खाल्लेले अन्नपदार्थ सहज आणि योग्य पद्धतीने पचण्यासाठी (How chewing food well can help in weight loss) एक घास किमान ३२ वेळा चावून खावा, असा समज फार पूर्वीपासून आपल्याकडे मानला जातो. घरातील मोठी माणसे देखील आपल्याला जेवताना, जेवण योग्य पद्धतीने चावून खाण्याचा सल्ला अनेकदा देतात. खरंतर, अन्न हळूहळू चावण्याची पद्धत अन्न योग्यरित्या पचण्यास मदत करते(Eating slower may help with weight loss).

अन्न हळूहळू चावणे हे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही पद्धत अधिक जास्तच उपयुक्त ठरते. आयुर्वेदानुसारही वजन कमी करण्यासाठी, अन्नपदार्थ हळूहळू चावून खाणे अधिक योग्य मानले जाते. मुंबईतील केटी क्लिनिकच्या आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. अंजू मंकणी यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत, अन्नपदार्थ हळूहळू चावण्याची पद्धत, वजन कमी करण्यास कशी मदत करते? याबद्दल अधिक माहिती दिली आहे. 

अन्न हळूहळू चावल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते ?

१. पचन चांगले होते :- वजन कमी करण्यासाठी, अन्नपदार्थांचे योग्य पचन होणे देखील तितकेच महत्वाचे असते. जर तुम्ही अन्नाचा प्रत्येक तुकडा व्यवस्थित आणि हळूहळू चावला तर अन्न व्यवस्थित पचते. अन्न शरीरात द्रव स्वरूपात प्रवेश करते, ज्यामुळे ते पचण्यास सहजसोपे होते. अन्नाचे योग्य पचन झाल्यास बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. यामुळे शरीराला अन्नातून पोषक तत्वे शोषणे देखील सोपे होते, परिणामी वजन कमी होण्यास अधिक मदत होते. 

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...

२. जास्त प्रमाणांत खाण्याची शक्यता कमी होते :- वजन कमी करण्यासाठी, निरोगी अन्न खाणे आणि योग्य प्रमाणात खाणे दोन्ही महत्वाचे असते. जर तुम्ही तुमचे अन्न हळूहळू चावून खाल्ले तर तुमच्या मेंदूला तुमचे पोट लवकर भरल्याचा संकेत मिळतो. अशा प्रकारे खाल्ल्याने वेटलॉस करण्यास मदत होते. या पद्धतीचा वापर केल्याने, कॅलरीजचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होते. यामुळे वजन कमी करताना जास्त खाण्याची शक्यता देखील टाळता येते. 

३. कॅलरीजचे प्रमाण कमी करता येते :- वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज असलेला आहार घेणे खूप महत्वाचे असते. कारण जोपर्यंत तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत शरीर चरबी जाळण्यास सुरुवात करणार नाही. तज्ज्ञांच्या मते, जे लोक अन्न हळूहळू चावतात त्यांच्यात जलद जेवणाऱ्यांच्या तुलनेत कॅलरीजचे प्रमाण कमी असते. अशाप्रकारे कॅलरीजचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

४. फूड क्रेविंग्स रोखणे शक्य होते :- वजन कमी करण्यासाठी वारंवार होणारे फूड क्रेविंग्स रोखणे देखील आवश्यक असते. सतत काहीतरी खात राहण्याची इच्छा आपल्याला अनेकदा होतेच. या सवयीमुळे देखील आपलं वजन वाढू शकत. जर अन्नपदार्थ हळूहळू चावून खाल्ले तर ते नैसर्गिकरित्या वारंवार खाण्याची  तीव्र इच्छा नियंत्रित करण्यास मदत होते. यामुळे मनाला पोट भरल्याचा संकेत मिळतो, ज्यामुळे कॅलरीज कमी होतात.

उन्हाळ्यात वजन कमी करा झरझर, खा 'ही' ६ फळं ! खा मस्त व्हा तंदुरुस्त पटकन..

वजन कमी करण्यासाठी अन्नपदार्थ हळूहळू चावणे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि खाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. अशा प्रकारे खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोटफुगी आणि आम्लपित्त यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. अन्नपदार्थ हळूहळू चावल्याने, कमी खाल्ले तरी पोट लवकर भरते, ज्यामुळे अन्नाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. अशाप्रकारे, वारंवार खाण्याची इच्छा देखील नियंत्रित केली जाते. म्हणून, अन्नाचा प्रत्येक घास ३२ ते ४० वेळा चावून खाण्याचा सल्ला दिला जातो, आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांचे द्रव स्वरुपात रूपांतर होईपर्यंत चावून खाण्याने वजन कमी होण्यास अधिक मदत होते.

Web Title: Why Chewing Food Slowly Is Important For Weight Loss Eating slower may help with weight loss Does Eating Slowly Help You Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.