Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मखाणे खाण्याचे ५ फायदे, पावसाळ्यात मखाणे खा-हेल्दी राहा.. मधल्यावेळच्या भूकेसाठी उत्तम पर्याय

मखाणे खाण्याचे ५ फायदे, पावसाळ्यात मखाणे खा-हेल्दी राहा.. मधल्यावेळच्या भूकेसाठी उत्तम पर्याय

दोन वेळेसच्या जेवणातल्या मधल्या काळात लागणाऱ्या भूकेला (what to eat snacks) जर चुकीचे पदार्थ खाल्ले तर त्याचे आरोग्य आणि वजनावर दुष्परिणाम होतात. मधल्या भुकेसाठीचा पौष्टिक नाश्ता (Makhana as healthy snacks) म्हणून तज्ज्ञ मखाणे खाण्याचा सल्ला देतात. एकूणच महिलांच्या आरोग्यासठी (women's health) आणि वजन कमी करण्यासाठी मखाणे खाणं (eat makhana for weight loss) फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 02:22 PM2022-08-27T14:22:56+5:302022-08-27T14:34:22+5:30

दोन वेळेसच्या जेवणातल्या मधल्या काळात लागणाऱ्या भूकेला (what to eat snacks) जर चुकीचे पदार्थ खाल्ले तर त्याचे आरोग्य आणि वजनावर दुष्परिणाम होतात. मधल्या भुकेसाठीचा पौष्टिक नाश्ता (Makhana as healthy snacks) म्हणून तज्ज्ञ मखाणे खाण्याचा सल्ला देतात. एकूणच महिलांच्या आरोग्यासठी (women's health) आणि वजन कमी करण्यासाठी मखाणे खाणं (eat makhana for weight loss) फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

Why fox nut is important for women's health? How to eat fox nut for weight loss and health benefits? | मखाणे खाण्याचे ५ फायदे, पावसाळ्यात मखाणे खा-हेल्दी राहा.. मधल्यावेळच्या भूकेसाठी उत्तम पर्याय

मखाणे खाण्याचे ५ फायदे, पावसाळ्यात मखाणे खा-हेल्दी राहा.. मधल्यावेळच्या भूकेसाठी उत्तम पर्याय

Highlightsमखाण्यांमध्ये उष्मांक खूपच कमी असतात. मखाण्यांमधील ॲण्टि ऑक्सिडण्ट्समुळे त्वचा तरुण राहाते.मखाणे खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी दोन्ही वेळेसच्या जेवणात काय आणि किती खाता एवढंच फक्त महत्वाचं नाही. दोन वेळेसच्या जेवणातल्या मधल्या काळात लागणाऱ्या भूकेला काय खाता (what eat as snacks)  हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण मधल्या वेळेस जर चुकीचे पदार्थ खाल्ले तर त्याचे आरोग्य आणि वजनावर दुष्परिणाम होतात. मधल्या भुकेसाठीचा पौष्टिक नाश्ता म्हणून तज्ज्ञ मखाणे (healthy fox nuts)  खाण्याचा सल्ला देतात. एकूणच महिलांच्या आरोग्यासठी  (women health) आणि वजन कमी करण्यासाठी ( eat fox nut for weight loss)  मखाणे खाणं फायदेशीर असल्याचं आहार तज्ज्ञ आणि फिटनेस ट्रेनर विवेक कुमार सांगतात. मखाण्यांमध्ये कोलेस्टेराॅल, फॅट्स आणि सोडियमचं प्रमाण कमी असतं.  मखाण्यांमध्ये प्रथिनांचं आणि कर्बोदकांचं प्रमाण चांगलं असतं. मखाणे हे ग्लुटेन फ्री असल्यानं  मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर  (benefits of eating fox nut) ते खाणं फायदेशीर ठरतं. 

Image: Google

महिलांनी मखाणेका खावे?

1 कप मखाण्यांमध्ये ( साधारण 32 ग्रॅम) 106 उष्मांक असतात. उष्मांक कमी असल्याने मखाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. मखाण्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण चांगलं असल्यानं मखाणे खाल्ल्यानंतर पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. मखाणे खाल्ल्यावर जास्तीचं खाणं टाळलं जातं. 

2. मखाण्यांमध्ये गॅलिक ॲसिड आणि क्लोरोजेनिक ॲसिड असे ॲण्टि ऑक्सिडण्ट्स असतात. हे ॲण्टि ऑक्सिडण्ट्स हदयाचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. हदयरोग आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी मखाणे खाणं लाभदायी ठरतं.

3. मखाण्यांमध्ये ॲण्टि ऑक्सिडण्ट्सचं प्रमाण भरपूर असल्यानं याला ॲण्टि एजिंग फूडही म्हटलं जातं. कारण मखाण्यांमधील ॲण्टि ऑक्सिडण्ट्समुळे त्वचेचं पोषण होतं. त्वचा तरुण आणि सुंदर दिसण्यास मदत होते. 

Image: Google

4. सतत वाढणाऱ्या वजनाचा प्रश्न सोडवण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्याला मखाणे खाणं हा चांगला उपाय आहे. मखाण्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्याने मूठभर मखाणे खाल्ले तरी शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, सतत भूक लागत नाही. जास्तीचं खाल्लं जात नाही. 

5.पचन क्रिया सुधारण्यासाठी मखाणे फारच उपयुक्त ठरतात. मखाण्यांमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. पचन क्रिया सुधारण्यासाठी , पोट स्वच्छ होण्यासाठी मखाणे खाणं फायदेशीर ठरतं. तसेच मखाण्यांमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असल्याने महिलांनी आणि विशेषत: गरोदर महिलांनी मखाणे खायला हवेत. 
6. मखाणे खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मखाण्यांमध्ये शरीर शुध्द करणारे घटक असल्यानं त्याचा फायदा पोटाच्या आरोग्यासाठीही होतो. 

Image: Google

मखाणे कसे खावेत?

1. मखाणे परतून किंवा मिक्सरमधून बारीक करुन  खाल्ले तरी चालतात. मखाणे रात्रभर पाण्यात भिजवून ते सूप, सॅलेड यामध्ये टाकूनही खाता येतात. 

2. परतून मखाने खाल्ल्यास ते जास्त फायदेशीर ठरतात. यासाठी कडईत किंवा नाॅनस्टिक कढईत मखाणे कोरडेच भाजावेत. गॅसची आच मंद करुन मखाणे भाजावेत. थोडा सोनेरी रंग आला की गॅस बंद करावा. थोडे गार झाले की हे मखाणे हवाबंद डब्यात भरुन ठेवावेत. 

3. मखाणे थोड्या तुपात किंवा खोबऱ्याच्या तेलात परतून घ्यावेत. ते परतले गेले की त्यावर थोडा  चाट मसाला आणि मीठ घालावं. जास्त मसाले घालून मखाणे खाऊ नयेत. 

4. पौष्टिक चवीचे मखाणेही करता येतात. यात स्वादासाठी आरोग्यास लाभदायी मसाल्यांचा वापर केला जातो. यासाठी कढईत थोडं तूप घ्यावं. ते गरम झालं की त्यात मखाणे परतायला घ्यावेत. मखाणे परतत असताना त्याती थोडी पुदिन्याची पानं, कढीपत्ता, धने पावडर, लसून पावडर, हळद, हिरवी मिरची घालून मखाने चांगले परतून घ्यावेत. या पध्दतीनं मखाणे केल्यास ते रुचकरही होतात आणि पौष्टिकही.

 

Web Title: Why fox nut is important for women's health? How to eat fox nut for weight loss and health benefits?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.