Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > चॉकलेट खाताना गिल्ट कशाला, खा बिंधास्त! रोज 1 चॉकलेट, वेटलॉससाठी गोड उपाय

चॉकलेट खाताना गिल्ट कशाला, खा बिंधास्त! रोज 1 चॉकलेट, वेटलॉससाठी गोड उपाय

Weightloss: चॉकलेट (chocolate)खूप खावं वाटतं? पण वजन वाढेल याची चिंता? पण ही चिंता सोडा आणि मोकळ्या मनाने चॉकलेट खा.... कारण हाच तर आहे वजन कमी करण्याचा सगळ्यात गोड उपाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 06:37 PM2021-11-23T18:37:34+5:302021-11-23T18:40:25+5:30

Weightloss: चॉकलेट (chocolate)खूप खावं वाटतं? पण वजन वाढेल याची चिंता? पण ही चिंता सोडा आणि मोकळ्या मनाने चॉकलेट खा.... कारण हाच तर आहे वजन कमी करण्याचा सगळ्यात गोड उपाय !

Why gilt while eating chocolate? 1 chocolate per day helps for weight loss, Benefits of eating dark chocolate | चॉकलेट खाताना गिल्ट कशाला, खा बिंधास्त! रोज 1 चॉकलेट, वेटलॉससाठी गोड उपाय

चॉकलेट खाताना गिल्ट कशाला, खा बिंधास्त! रोज 1 चॉकलेट, वेटलॉससाठी गोड उपाय

Highlightsचॉकलेट किती, कोणतं आणि कसं खावं, याचं एक प्रमाण ठरलेलं आहे. फक्त तेवढं एक फॉलो करा आणि मोकळेपणाने चॉकलेट खा.

लहान मुलं असो की मोठी माणसं... चॉकलेट समोर आलं की खाण्याची इच्छा होतेच होते.. एकदा तो चॉकलेटचा तुकडा उचलावा आणि तोंडात टाकावा, असं नक्कीच वाटतं. पण मग उगाच गोड खाऊन वजन वाढेल का, याची चिंता वाटू लागते. तुम्हालाही चॉकलेट खूप आवडत असेल, पण फक्त वजन वाढण्याच्या चिंतेने तुम्ही चॉकलेट खाणं टाळत असाल, तर खरंच असं करू नका. कारण चॉकलेटबाबत जे काही अभ्यास करण्यात आले आहेत, त्यानुसार चॉकलेट खाणं हे वजन कमी करण्याचा एक चांगला उपाय आहे. पण अर्थातच चॉकलेट किती, कोणतं आणि कसं खावं, याचं एक प्रमाण ठरलेलं आहे. फक्त तेवढं एक फॉलो करा आणि मोकळेपणाने चॉकलेट खा. रोज ५० ग्रॅम एवढे डार्क चॉकलेट (Dark chocolate) खाणे योग्य मानले गेले आहे. 

 

वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट महत्त्वाचे
Dark chocolate is the best way to reduce weight

डार्क चॉकलेटमध्ये ७० टक्के असे पदार्थ असतात, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे जर तुम्ही वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल, तर डार्क चॉकलेटचा एक छोटा तुकडा दररोज खाण्यास हरकत नाही. डार्क चॉकलेट हे कोको बीन्सपासून तयार केलेले असतात. त्यामध्ये लोह, तांबे, झिंक, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे लो कॅलरी गोड पदार्थ म्हणून देखील डार्क चॉकलेटचा पर्याय निवडायला हरकत नाही. याशिवाय डार्क चॉकलेटमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात. हे फायबर पोटात गेल्यानंतर आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळेही वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त ठरते. त्यामुळेच तर आता दररोज डार्क चॉकलेटचा एक छोटासा तुकडा तोंडात टाकायला काहीच हरकत नाही. 

आजी सांगायची, रोज बेसन हळद साय लाव चेहऱ्याला.. तेच करा, बेसनाचे ३ फेसपॅक, चेहरा नितळ तजेलदार

 

 

डार्क चॉकलेट खाण्याचे इतर अनेक फायदे
Benefits of eating dark chocolate
१. पचनशक्ती सुधारते

डार्क चॉकलेटमध्ये असे काही घटक असतात, जे पचन क्रियेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या एन्झाईम्सला सक्रिय करतात. त्यामुळे 
शरीरातील चयापयच क्रिया सुधारते. चयापचय (metabolism) क्रियेचा वेग वाढल्यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच शरीरात अतिरिक्त चरबी साठून राहत नाही. त्यामुळेही वजन कमी होण्यास फायदा होतो. 

 

२. डार्क चॉकलेटमुळे मिळते एनर्जी
डार्क चॉकलेटमध्ये झिंक, मॅग्नेशियम, तांबे अशा पौष्टिक घटकांचे प्रमाण खूप चांगले असते. रोगप्रतिकारक (immunity) शक्ती वाढण्यासाठी झिंक अतिशय उपयुक्त आहे. तसेच शरीराला जर योग्य प्रमाणात मॅग्नेशियम मिळाले तर रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. तसेच डार्क चॉकलेटमधील तांबे मेंदूचे काम अधिक वेगवान करतो. त्यामुळेच कधी एनर्जी डाऊन झाली असेल, तर डार्क चॉकलेट नक्की खा. यामुळे उत्साह तर येतोच पण अधिक सकारात्मक वाटू लागते. त्यामुळेच तर डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे मानसिक स्वास्थ्यही (mental health) चांगले राहते, असे मानले जाते. ताणतणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खाणे उत्तम आहे.

 

३. हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त
डार्क चॉकलेटमध्ये मँगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस असे घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक हृदय, मज्जासंस्था यांचे कार्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. तसेच फॉस्फरसमुळे हाडांना आणि दातांना मजबूती मिळते. त्यामुळेच दररोज योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट खाण्यास काहीच हरकत नाही.

 

 

मंदिरा बेदीचा फिटनेस स्टंट, वय ५० आणि एकावेळी मारले ३३ हॅण्डस्टॅण्ड, व्हिडीओ पाहाल तर म्हणाल..

४. बॅड कोलेस्टरॉल होते कमी
आपल्या शरीरात बॅड कोलेस्टरॉल (cholesterol)आणि गुड कोलेस्टरॉल असे दोन प्रकार असतात. यापैकी बॅड कोलेस्टरॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटची मदत होते. त्यामुळे हृदयासाठीही डार्क चॉकलेट चांगले मानले गेले आहे. 

 

Web Title: Why gilt while eating chocolate? 1 chocolate per day helps for weight loss, Benefits of eating dark chocolate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.