Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पावसाळ्यात सगळ्या डाळी खायलाच हव्यात, मात्र तज्ज्ञ सांगतात डाळी खाण्याची योग्य पद्धत..

पावसाळ्यात सगळ्या डाळी खायलाच हव्यात, मात्र तज्ज्ञ सांगतात डाळी खाण्याची योग्य पद्धत..

How To Make Pulses And Legumes More Healthy: पावसाळ्यात अनेक पदार्थ पचायला त्रास होतो. त्यामुळे कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत, याची अचूक माहिती असणं कधीही उत्तम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2022 03:08 PM2022-08-09T15:08:20+5:302022-08-09T15:09:07+5:30

How To Make Pulses And Legumes More Healthy: पावसाळ्यात अनेक पदार्थ पचायला त्रास होतो. त्यामुळे कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत, याची अचूक माहिती असणं कधीही उत्तम.

Why pulses and legumes are important to eat in monsoon? Correct method of eating pulses and legumes | पावसाळ्यात सगळ्या डाळी खायलाच हव्यात, मात्र तज्ज्ञ सांगतात डाळी खाण्याची योग्य पद्धत..

पावसाळ्यात सगळ्या डाळी खायलाच हव्यात, मात्र तज्ज्ञ सांगतात डाळी खाण्याची योग्य पद्धत..

Highlightsडाळी कशा पद्धतीने खाव्या, जेणेकरून त्या अधिक पौष्टिक ठरतील, याची ही खास माहिती

पावसाळ्यासारखा आल्हाददायक आणि नयनरम्य ऋतू दुसरा कोणताही नाही.. पण या दिवसांत या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तब्येत मात्र ठणठणीत रहायलाच हवी. कारण या दिवसांत अनेक पदार्थ पचत नाहीत. त्यामुळे मग पोटाचे (Diet in monsoon) त्रास तर होतातच, पण संसर्गजन्य आजारांचं प्रमाणही वाढतं. शिवाय या दिवसांत म्हणजेच श्रावणात किंवा काही ठिकाणी संपूर्ण चातुर्मासातच हिरव्या पालेभाज्या, कंद प्रकारच्या भाज्या  किंवा सलाड (superfood for rainy season) खाणे अनेक ठिकाणी वर्ज्य  मानले जाते. (proper method of eating pulses and legumes)

 

मग अशावेळी शरीरात कोणत्याही पोषणमुल्यांची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून पावसाळ्यात कोणते घटक आहारात आवर्जून घ्यायला हवेत, याविषयीची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यासगळ्या पदार्थांना त्या मान्सून सुपरफूड असं म्हणत असून यामध्ये त्यांनी पावसाळ्यात सगळ्या डाळी आवर्जून खायला पाहिजेत असं सांगितलं आहे. पण डाळी कशा पद्धतीने खाव्या, जेणेकरून त्या अधिक पौष्टिक ठरतील, याची ही खास माहिती त्यांनी शेअर केली आहे. 

 

पावसाळ्यात डाळी खाण्याचे ३ नियम
१. पावसाळ्यात डाळी खाण्याच्या आधी त्या काही काळ भिजत ठेवा. मुगाच्या डाळी ऐवजी मुग, मसूर डाळीऐवजी मसूर अशी कडधान्य शिजवण्याच्या आधी भिजत घाला. काही तास भिजवल्यानंतर त्यांना मोड येऊ द्या आणि नंतर ते खा. यामुळे त्यांच्यातलं पोषणमुल्य अधिक वाढतं.

नारळी भात कधी गचका होतो, कधी खूपच गोड? घ्या अचूक प्रमाण, करा परफेक्ट नारळीभात 
२. डाळी किंवा कडधान्य नुसती खाण्यापेक्षा ती जर तुम्ही भात, पोळी, भाकरी यांच्यासोबत खाल्ली तर धान्य आणि कडधान्य किंवा डाळी यांचं कॉम्बिनेशन खूप जास्त पौष्टिक ठरतं. जर तुम्ही भातासोबत डाळी किंवा कडधान्य खात असाल तर त्यांचं प्रमाण १: ३ असावं. पोळी किंवा भाकरीसोबत खाताना प्रमाण १: २ असावं. 
३. भारतात डाळी आणि कडधान्य यांचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पापड, इडली, लाडू, शेव- चकल्या अशा पदार्थांमधून वेगवेगळ्या डाळी आपल्या पोटात जातातच. पण एका आठवड्यात कमीतकमी ५ वेगवेगळ्या डाळी किंवा कडधान्ये आपल्या आहारात असावीत, अशी काळजी घ्या.  

 

पावसाळ्यात हे पदार्थ खाणंही गरजेचं...
पावसाळ्यात कोणते पदार्थ खाणं शरीरासाठी अतिशय गरजेचं आहे, अशा पदार्थांची नावे आणि त्यांची माहिती ऋजुता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. या पदार्थांचा उल्लेख त्या मान्सून सुपरफूड असा करतात. त्यामुळे पावसाळी आहारात हे काही पदार्थही असतील, याची काळजी घ्या..

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय
१. सातूचे पीठ
२. स्वीटकाॅर्न
३. अळूची पाने
४. देशी खजूर
५. नाचणी
६. फणसाच्या बिया 

 

Web Title: Why pulses and legumes are important to eat in monsoon? Correct method of eating pulses and legumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.